Mumbai Crime : दारुच्या नशेत असलेल्या पत्नीचा हैदोस! पतीसोबत केलं धक्कादाय कृत्य; पोलीसही झाले थक्क
Last Updated:
Mumbai Cirme : जोगेश्वरीत दारूच्या नशेत असलेल्या पत्नीने पतीसोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. सध्या आंबोली पोलिसांनी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई : मुंबईतील जोगेश्वरी परिसरात घरातील एका क्षुल्लक वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारूच्या नशेत असलेल्या पत्नीने रागाच्या भरात पतीवरच चाकून हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वाद का वाढला?
मिळालेल्या माहितीनुसार, मोहोम्मद रफिक कुरेशी हे प्लंबर म्हणून काम करतात. दरम्यान 31 मार्च च्या रात्री ते कामावरुन घरी आले असता त्यांची पत्नी सबा कुरेशी ही दारुच्या नशेत असल्याचे त्यांना दिसले. त्यावरुन त्यांनी पत्नीला जाब विचारला. पतीने विचारलेल्या प्रश्नामुळे दोघांमध्ये भांडण सुरु झाले आणि काही वेळातच हा वाद अधिकच वाढला.
advertisement
वादाच्या नादात संतापलेल्या सबा कुरेशीन घरातील भाजी चिकण्याचा चाकू आणत पतीवर हल्ला केला. या हल्ल्यात पतीच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून जखमी अवस्थेत त्याला जवळील रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणाची तक्रार दाखल आंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी आरोपी पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 05, 2026 1:13 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime : दारुच्या नशेत असलेल्या पत्नीचा हैदोस! पतीसोबत केलं धक्कादाय कृत्य; पोलीसही झाले थक्क









