advertisement

अशोक खरातनंतर मंजुनाथ शेट्टी; ठाण्यात काळं कांड, दीड कोटी घेतले अन्..., 25 वर्षीय तरुणी पोलिसात

Last Updated:

Thane News: वेळोवेळी नवीन कारणे देत आणि भीती दाखवत पैशांची मागणी सुरू राहिली. न्यायालयीन प्रकरणे, अपुरे पूजाविधी आणि भविष्यातील संकटांची तो भीती घालत होता.

आणखी एक भोंदूबाबा! पूजा-विधी करायला सांगितलं, 25 वर्षीय तरुणी..., काळं काड पाहून ठाण्यात खळबळ
आणखी एक भोंदूबाबा! पूजा-विधी करायला सांगितलं, 25 वर्षीय तरुणी..., काळं काड पाहून ठाण्यात खळबळ
ठाणे: राज्यात भोंदूबाबा अशोक खरातचं प्रकरण ताजं असतानाच ठाण्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. ‘तुमच्या जीवाला धोका आहे,’ असे सांगत एका भोंदूबाबाने एका कुटुंबाची मोठी फसवणूक केली. पूजाविधी आणि यात्रेचा तोडगा सांगत तब्बल 1 कोटी 66 लाख 50 हजार रुपये हडपले. या प्रकरणात हिरानंदानी इस्टेटमधील 25 वर्षीय तरुणीने पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार मंजुनाथ शेट्टी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
नेमकं घडलं काय?
ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘तुमच्या जीवाला धोका’ असल्याचा बनाव करत फेब्रुवारी 2024 ते जानेवारी 2026 या काळात फसवणुकीचा प्रकार घडला. या प्रकरणात संबंधित भोंदूबाबाविरोधात तरुणीने तक्रार दाखल केली.
advertisement
भीती घातली अन्...
मंजुनाथ शेट्टी याने सामाजिक ओळखीचा फायदा घेत कुटुंबाचा विश्वास संपादन केला. कुटुंबांना अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकवून भीती घातली. तसेच यावर उपाय म्हणून केरळच्या पुजाऱ्यामार्फत पूजाविधी आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी फेब्रुवारी ते एप्रिल 2024 या काळात 10 लाख रुपये रोख घेतले, असं तक्रारीत नमूद आहे.
पैशांची मागणी
दरम्यान, यानंतर पैशांची मागणी वाढत गेली. वेळोवेळी नवीन कारणे देत आणि भीती दाखवत पैशांची मागणी सुरू राहिली. न्यायालयीन प्रकरणे, अपुरे पूजाविधी आणि भविष्यातील संकटांची तो भीती घालत होता. मे 2024 ते जानेवारी 2026 या काळात त्याने 1.56 कोटी रुपये विविध बँक खात्यांवर ट्रान्सफर करून घेतले. असे एकूण 1 कोटी 66 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली.
advertisement
दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित कुटुंबाने कासारवडवली पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
अशोक खरातनंतर मंजुनाथ शेट्टी; ठाण्यात काळं कांड, दीड कोटी घेतले अन्..., 25 वर्षीय तरुणी पोलिसात
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement