Iran US Conflict: '' ट्रम्प खोटं बोलतात'', अमेरिकेच्या रेस्क्यू मिशनला इराणचा सुरुंग? इस्फहानमध्ये धुराचे लोट, बचाव दलाचं विमान पाडल्याचा दावा
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Iran War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये बेपत्ता असलेल्या आपल्या वैमानिकाला सुखरूप वाचवल्याची घोषणा केली असतानाच, इराणने मात्र अमेरिकेला मोठा धक्का दिल्याचा दावा केला आहे.
तेहरान/वॉशिंग्टन: अमेरिका-इस्रायलने लादलेल्या युद्धाविरोधात इराणचा प्रतिकार सुरू आहे. जवळपास महिनाभरापासून युद्ध सुरू असून जगातील अनेक देशांनी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेने केलेल्या हल्ल्याविरोधात इराणकडून आखाती देशात असलेले अमेरिकेचे लष्करी तळ उद्धवस्त केले जात आहे. तर, दुसरीकडे इराणने अमेरिकेचे काही फायटर जेट पा़डले आहेत. अशातच आता मोठी घडामोड समोर आली आहे. एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये बेपत्ता असलेल्या आपल्या वैमानिकाला सुखरूप वाचवल्याची घोषणा केली असतानाच, इराणने मात्र अमेरिकेला मोठा धक्का दिल्याचा दावा केला आहे. इराणच्या 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स'ने (IRGC) वैमानिकाच्या शोध मोहिमेत सहभागी असलेले अमेरिकेचे आणखी एक विमान पाडल्याचे जाहीर केले आहे.
इस्फहानमध्ये धुराचे लोट आणि इराणचा दावा
इराणची वृत्तसंस्था 'फार्स'ने दिलेल्या माहितीनुसार, इस्फहान प्रांताच्या दक्षिण भागात बेपत्ता अमेरिकन कर्नलचा शोध घेणाऱ्या विमानावर इराणच्या हवाई संरक्षण दलाने मारा केला. इराणने आपल्या टेलिग्राम चॅनेलवर एक फोटोही प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये शेतातून काळ्या धुराचे प्रचंड लोट निघताना दिसत आहेत. "मोठा पराभव लपवण्यासाठी ट्रम्प यांचा हा हतबल प्रयत्न आहे," अशी जहरी टीका इराणने केली आहे.
advertisement
ट्रम्प यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह?
काही वेळापूर्वीच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या सुटकेची माहिती दिली होती. त्यांनी म्हटले की, अमेरिकन सैन्याने अत्यंत धाडसी मोहीम राबवून आपल्या वैमानिकाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे. मात्र, आता इराणने विमान पाडल्याचा दावा केल्यामुळे ही मोहीम खरोखरच यशस्वी झाली की अमेरिका काहीतरी लपवत आहे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. इराणच्या दाव्यानुसार, ज्या भागात वैमानिक लपला होता, त्याच भागात हे विमान पाडण्यात आले आहे.
advertisement
परिस्थिती गंभीर, तणाव शिगेला
सध्या इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांकडून परस्परविरोधी दावे केले जात आहेत. अमेरिकेने इराणच्या या दाव्यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, जर इराणचा दावा खरा असेल, तर अमेरिकेसाठी हा मोठा लष्करी आणि राजनैतिक धक्का मानला जाईल. या नवीन घडामोडीमुळे दोन्ही देशांमधील युद्ध अधिक भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Location :
New Delhi,New Delhi,Delhi
First Published :
Apr 05, 2026 1:29 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Iran US Conflict: '' ट्रम्प खोटं बोलतात'', अमेरिकेच्या रेस्क्यू मिशनला इराणचा सुरुंग? इस्फहानमध्ये धुराचे लोट, बचाव दलाचं विमान पाडल्याचा दावा







