advertisement

Kitchen Tips : लंच बॉक्सच्या बॅगला फक्त साबणाने धुणं पुरेसं नाही! 'असं' करा डीप क्लिनिंग, दूर होईल दुर्गंधी!

Last Updated:

जिद्दी डाग आणि बॅगला लागलेला तीव्र वास काढण्यासाठी काही घरगुती उपाय तुमची मदत करू शकतात. या उपायांनी काही मिनिटात तुमची बॅग स्वच्छ होईल.

अशाप्रकारे पूर्णपणे स्वच्छ करा बॅग..
अशाप्रकारे पूर्णपणे स्वच्छ करा बॅग..
मुंबई : कॉलेजमध्ये किंवा ऑफिसला डबा घेऊन जाण्यासाठी आपण रोज टिफिन बॅग वापरतो. या बागेकडे तसे फारसे लक्ष दिले जात नाही. कारण हल्ली डबेही एअर टाईट मिळतात, ज्यातून कमीवेळा अन्न सांडतं. म्हणून या टिफिन बॅगला सारखी धुण्याची आपल्याला गरज वाटत नाही. पण बऱ्याचदा या बॅगमध्ये ठेवलेल्या अन्नाचा वास त्याला लागून जातो आणि कालांतराने वाढतो.
बॅगमध्ये एखादवेळी चुकून अन्न सांडलं असेल तर ते घरी येईपर्यंत वळून जातं आणि नकळत आपलं त्याकडे दुर्लक्ष होतं. नंतर जेव्हा बॅगमधून वास येऊ लागतो तेव्हा आपण ती धुवायला घेतो. अशावेळी हे जिद्दी डाग आणि बॅगला लागलेला तीव्र वास काढण्यासाठी काही घरगुती उपाय तुमची मदत करू शकतात. या उपायांनी काही मिनिटात तुमची बॅग स्वच्छ होईल.
advertisement
अशाप्रकारे पूर्णपणे स्वच्छ करा बॅग..
- बऱ्याचदा बॅग बाहेरून स्वच्छ दिसते. पण त्यात आतमध्ये लहान डाग, सांडलेले अन्न, ओलावा आणि दुर्गंधी हळूहळू जमा होत जाते. कधीकधी बॅग पुसल्यानंतरही तिला एक विचित्र वास येतो. जेव्हा आपण बॅगमध्ये दूध, डाळ किंवा ग्रेव्ही ठेवतो. तेव्हा हा वास जास्त येतो. म्हणूनच बॅग स्वच्छ करताना तिची शिवण आणि कोपरे स्वच्छ करणे का महत्त्वाचे आहे.
advertisement
- लंच बॅगचे कोपरे आणि शिवणीचे भाग यामध्ये जास्त घाण लपलेली असू शकते. म्हणून हे भाग स्वच्छ करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी एक जुना टूथब्रश घ्या, तो सौम्य साबणाच्या पाण्यात बुडवा आणि हे भाग हळुवारपणे घासून स्वच्छ करा. असं केल्याने लपलेली घाण निघून जाईल आणि दुर्गंधी कमी होईल.
- तुमच्या लंच बॅगवर डाळ, दूध किंवा मांसाहारी पदार्थ सांडले असतील तर फक्त साबणाने धुणं पुरेसं होणार नाही. अशात एन्झाइम-आधारित क्लीनर्स खूप उपयुक्त ठरतात. ते अन्नाचे डाग आणि दुर्गंधी निर्माण करणारे घटक काढून टाकतात. यासाठी कापडावर थोडंसं क्लीनर घेऊन डाग असलेल्या भागावर लावा आणि नंतर स्वच्छ धुवा.
advertisement
- तुमची बॅग वॉशिंग मशीनमध्ये टाकता येत नसेल, तर स्टीम हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही स्टीमर वापरू शकता किंवा बॅग उकळत्या पाण्याजवळ ठेवू शकता. वाफेमुळे जिवाणू मारतात आणि आतली घाण सैल होते. स्टीम केल्यानंतर तुम्ही बॅग धुवाल तेव्हा ती आतून व्यवस्थित स्वच्छ होते.
- लंच बॅगच्या आतील इन्सुलेशन लेयरमध्ये अनेकदा दुर्गंधी साठते. तुम्ही बेकिंग सोडा किंवा ॲक्टिव्हेटेड चारकोल वापरू शकता. बॅगमध्ये एका लहान वाटीत बेकिंग सोडा किंवा ॲक्टिव्हेटेड चारकोल रात्रभर ठेवा. यामुळे दुर्गंधी शोषली जाते आणि तुम्ही जेव्हा दुसऱ्या दिवशी बॅग धुवाल तेव्हा बॅग फ्रेश होईल.
advertisement
- बॅगची झिप आणि चेनदेखील स्वच्छ करणं महत्त्वाचं आहे. याकडे आपलं दुर्लक्ष होऊ शकतं. पण तिथेही घाण साचते. हे स्वच्छ करण्यासाठी कापसाचा बोळा साबणाच्या पाण्यात बुडवून झिपर स्वच्छ करा. त्यानंतर झिपर सुरळीतपणे चालावी आणि ती खराब होऊ नये यासाठी थोडं व्हॅसलीन किंवा वॅक्स लावा.
- फक्त धुतल्यानंतरच नाही, तर इतरवेळीही बॅगला सूर्यप्रकाशात ठेवा. याने ओलावा आणि जीवाणू नाहीसे होतात. उन्हात ठेवण्यापूर्वी बॅग उलटी करा आणि सूर्यप्रकाशात ठेवा. ताज्या हवेवमध्ये उघडी करून ठेवूनही तुम्ही बॅग फ्रेश ठेऊ शकता.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : लंच बॉक्सच्या बॅगला फक्त साबणाने धुणं पुरेसं नाही! 'असं' करा डीप क्लिनिंग, दूर होईल दुर्गंधी!
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement