फसवणूक करणारे AI कसे वापरत आहेत आणि सुरक्षित कसे राहायचे
ऑनलाइन जॉब स्कॅम - आजकाल अनेक फसवणूक बनावट नोकरीच्या जाहिरातींपासून सुरू होतात. फसवणूक करणारे खऱ्या कंपन्यांच्या नावाखाली बनावट करिअर वेबसाइट आणि सोशल मीडिया जॉब पोस्ट तयार करतात. त्यानंतर ते 'रजिस्ट्रेशन' किंवा 'इंटरव्ह्यू प्रोसेसिंग' फीसच्या नावाखाली पैसे मागतात आणि आधार, पॅन किंवा बँक डिटेल्ससारखी पर्सनल माहिती मिळवतात.
advertisement
सावधान! बँकेच्या नावाने आलेला कॉल-SMS खरा की खोटा, असं करा चेक
Googleचा सल्ला:
जीमेल आणि गुगल मेसेजेसमधील Scam Detection फीचर अशा ईमेल आणि मेसेजेसना आपोआप ओळखते. याव्यतिरिक्त, तुमच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी Two-Step Verification चालू करा.
फेक रिव्ह्यू आणि एक्सटॉर्शन स्कॅम - स्कॅमर अनेकदा जाणूनबुजून एक-स्टार रिव्ह्यू पोस्ट करून बिझनेसच्या गुगल प्रोफाइल कमी करतात. नंतर मालकाकडून पैसे मागतात, जर त्यांनी पैसे दिले तर रिव्ह्यू काढून टाकण्याचे आश्वासन देतात.
Google Maps आता अशा एक्सटॉर्शन रिपोर्ट करण्याचा थेट ऑप्शन देते. गुगल सल्ला देते की, स्कॅमर्सशी संपर्क करु नका, कोणतेही पेमेंट करु नका, कोणतेही ट्रांझेक्शन करु नका, तसंच स्क्रीनशॉर्ट घेऊन रिपोर्ट करण्याचा सल्ला देते.
गिझरमध्ये पाणी लवकर गरमच होत नाही? या 5 सुपर ट्रिक्स येतील कामी
फेक AI अॅप्स -
स्कॅमर एआयच्या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा घेत आहेत. ते ChatGPT किंवा Gemini सारख्या साधनांचे वेश असलेले बनावट अॅप्स तयार करतात, जे प्रत्यक्षात तुमच्या फोनमधून डेटा चोरतात किंवा मालवेअर इंस्टॉल करतात.
Googleचा सल्ला:
केवळ अधिकृत अॅप स्टोअरमधून अॅप्स डाउनलोड करा आणि URL कडे लक्ष द्या. क्रोममधील Enhanced Safe ब्राउझिंग फीचर तुम्हाला रिअल-टाइममध्ये धोकादायक लिंक्सची चेतावणी देते.
फ्री VPN अॅप्समधून होणारी फसवणूक
फ्री VPN देण्याच्या आमिषाने अनेक लोक स्कॅमर्सना बळी पडतात. हे बनावट VPN अॅप्स तुमचे ब्राउझिंग डिटेल्स आणि बँक माहिती चोरू शकतात.
गुगलचा सल्ला:
तुमच्या फोनवर Play Protect ठेवा, जे आपोआप अॅप्स स्कॅन करते. तसेच, फक्त व्हेरिफाइड सोर्सकडून किंवा VPN बॅज असलेल्या अॅप्सवरून VPN अॅप्स डाउनलोड करा.
AIच्या वाढत्या वापरामुळे, सायबर गुन्हेगार हुशार झाले आहेत. परंतु गुगलच्या टूल्स आणि थोडी सतर्कतेमुळे, तुम्ही तुमचा डेटा आणि पैसे सुरक्षित ठेवू शकता.
