गुगलने आता त्याच्या जनरेटिव्ह एआय जेमिनीचं व्हर्जन 2.0 लाँच केलंय. त्यामुळे एआय आता मानवी विचारांच्या पलीकडे गेलंय. ते मानवी मदतीशिवाय स्वत:हून सहज निर्णय घेऊ शकतं. गुगलच्या ब्लॉग पोस्टनुसार, कंपनीने जेमिनी 2.0 अशा प्रकारे तयार केलंय की, ते मल्टीमोडॅलिटीमध्ये खूपच उत्तम आहे. भविष्याचा विचार करून तयार करण्यात आलेलं गुगलचं हे आतापर्यंतचं सर्वात प्रगत एआय मॉडेल आहे.
advertisement
WhatsAppने आणलंय खास फीचर! पण फक्त 15 दिवसांसाठी, आहे तरी काय?
जेमिनी 2.0 सोबतच गुगलने त्यांच्या सर्चमध्ये सुधारणा करण्यासाठी केलेल्या विविध कामांचा उल्लेख ब्लॉग पोस्टमध्ये केलाय. त्यानुसार, जेमिनी 2.0 फक्त निवडक डेव्हलपर्स आणि टेस्टर्ससाठी उपलब्ध असेल. लवकरच ते गुगलच्या इतर प्रॉडक्टमध्ये देखील इंटिग्रेट केलं जाईल. सर्वात अगोदर ते जेमिनी आणि गुगल सर्च यात इंटिग्रेट केलं जाईल. यासोबतच गुगलने जेमिनी 2.0 फ्लॅश देखील लाँच करण्याची घोषणा केलीय. हे सर्व जेमिनी युजर्सना वापरता येईल. ते एक एक्सपेरिमेंटल मॉडेल असेल. या सोबतच कंपनीने ‘डीप रिसर्च’ फीचर देखील लाँच केलंय.
काय आहे डीप रिसर्च फीचर?
डीप रिसर्च फीचर हे एक रिसर्च असिस्टंट म्हणून काम करेल. जे प्रगतशील तर्क आणि दीर्घ संदर्भ वापरून रिचर्स करेल. हे फीचर जेमिनी ॲडव्हान्स्डवर उपलब्ध करून देण्यात आलंय. या फीचरच्या मदतीने अनेक क्लिष्ट आणि अवघड विषयांवर चांगला रिसर्च केला जाईल. कोणत्याही व्यक्तीच्या मदतीशिवाय एक चांगला रिपोर्ट तयार करण्याचं काम या फीचरच्या मदतीने होईल.
तुम्हालाही नेटवर्क प्रॉब्लम येतोय का? एका कन्ज्यूमरला मिळाली 5 लाख भरपाई
स्वतःच निर्णय घेणार एआय
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं की, ‘कंपनीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जेमिनी फर्स्ट जनरेशन लाँच केलं होतं. आता या वर्षी जेमिनीचं सेकंड जनरेशन लाँच केलंय. जेमिनी 2.0 ची रचना ‘एजंटिक एरा’ म्हणजे ज्या वेळी मानवी हस्तक्षेपाची फारशी गरज लागणार नाही, अशा काळासाठी केली आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीने एआय टूल्स डेव्हलप करण्यासाठी मोठी गुंतवणूक केलीय. मानवी विचारापेक्षा अनेक पावलं पुढं जाऊन हे एआय काम करेल. स्वतःच योग्य निर्णय घेऊन त्यावर काम करेल. पण हे सर्व तुमच्या देखरेखीमध्येच होईल. जेमिनी 2.0 तशाच पद्धतीने काम करेल.’
एआय टेक्नॉलॉजीमध्ये गेल्या काही काळात वेगाने प्रगती होत असून, जेमिनी एआयचा वापरही वाढत आहे. त्यातच आता जेमिनी 2.0 व्हर्जन आल्यानं त्याचा आता युजर्सना खूपच फायदा होण्याची शक्यता आहे.
