Google Maps वर तुम्हाला निळ्या, लाल, पिवळ्या, हिरव्या अशा अनेक रंगांच्या रेषा दिसतात. या सगळ्या रेषा आणि रंगांचा एक विशिष्ट अर्थ असतो, हे रंग कधी ट्रॅफिक दाखवतात, कधी रस्ता, कधी जंगल किंवा पाणी. चला तर मग, हे रंग काय सांगतात ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. म्हणजे पुढच्यावेळी तुम्हाला गुगल मॅप रिड करणं सोपं होईल.
advertisement
निळा (Blue) रंग काय सांगतो?
निळा रंग म्हणजे तुम्ही ज्या रस्त्यावर जाणार आहात तो रस्ता.
गडद निळा असेल, तर ट्रॅफिक नाही – तुम्ही आरामात पोहोचू शकता.
हलकासा निळा रंग म्हणजे पाण्याचं स्थान – नदी, तलाव, समुद्र वगैरे तिथे आहे.
लाल (Red) रंगाचं लक्ष द्या
लाल रंग म्हणजे ट्रॅफिक जाम
जर रस्ता लाल दिसत असेल, तर तिथे गाड्यांची खूप गर्दी आहे.
खूप गडद लाल असेल, तर तिथे रस्ता जाम असू शकतो, त्यामुळे दुसरा पर्याय पाहा.
हिरवा (Green) म्हणजे काय?
हिरवा रंग जंगल, गार्डन, नॅशनल पार्क किंवा हिरवळ असलेल्या ठिकाणांसाठी असतो.
काही वेळा याचा अर्थ ट्रॅफिक नाही आणि रस्ता मोकळा आहे असाही असतो.
काळा (Black) आणि राखाडी (Gray) रंग म्हणजे काय?
हे रंग बंद रस्त्यांचा किंवा अपघात झालेल्या ठिकाणाचा इशारा करतात.
तिथून रस्ता बंद असू शकतो, किंवा खूप ट्रॅफिकमुळे वाट मिळत नसेल.
पिवळा (Yellow) रंग काय सांगतो?
पिवळा रंग म्हणजे मुख्य रस्ता, मोठा रोड जिथून ट्रॅफिक मध्यम असतो.
फार गर्दी नाही, पण अगदी मोकळाही नाही, त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो.
आता Google Maps कसं वापरायचं हे समजून घेऊ?
कोणत्याही ठिकाणी तुम्हाला लवकर पोहोचायचं आहे? तर ब्लू किंवा ग्रीन रंग असलेला रस्ता निवडा.
पिवळ्या रंगाच्या रस्त्यावर थोडा ट्रॅफिक असतो, पण बऱ्याचदा मॅनेजेबल असतो.
लाल आणि काळ्या रंगाच्या रस्त्यांपासून शक्यतो टाळा, हे रस्ते खूपच गर्दीचे असू शकतात.
