TRENDING:

2 फोनमध्ये एकच WhatsApp अकाउंट कसं चालवायचं? जाणून घ्या सोपी प्रोसेस

Last Updated:

WhatsApp Linked Device Feature: व्हॉट्सॲपवर एक फीचर उपलब्ध आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही एकच व्हॉट्सॲप अकाउंट दोन डिव्हाइसवर वापरू शकता. हे फीचर विशेषतः अशा यूझर्ससाठी फायदेशीर आहे ज्यांच्याकडे दोन फोन आहेत परंतु एकच व्हॉट्सॲप अकाउंट वापरतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
WhatsApp Companion Feature: व्हॉट्सॲप हे आज खूप लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप बनले आहे. बहुतेक लोक व्हॉट्सॲप वापरतात. WhatsApp चा वापर सामान्यतः चॅटिंग, ऑडिओ-व्हिडिओ फाइल्स शेअर करण्यासाठी आणि ऑडिओ-व्हिडिओ कॉल करण्यासाठी केला जातो. कंपनी यूझर्सच्या सोयीसाठी वेळोवेळी नवनवीन फीचर्स आणत असते. जी त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहेत. व्हॉट्सॲपवर एक फीचर उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही एकच व्हॉट्सॲप अकाउंट दोन डिव्हाइसवर वापरू शकता.
व्हॉट्सअॅप अकाउंट
व्हॉट्सअॅप अकाउंट
advertisement

दोन डिव्हाइसवर एक WhatsApp

हे फीचर विशेषतः अशा यूझर्ससाठी फायदेशीर आहे ज्यांच्याकडे दोन फोन आहेत. परंतु एकच व्हॉट्सॲप अकाउंट वापरतात. यासह, त्यांना दोन डिव्हाइसवर वेगवेगळ्या नंबरवरून व्हॉट्सॲप अॅक्टिव्ह करण्याची आवश्यकता नाही. याच्या मदतीने ते दोन्ही डिव्हाइसवर एकाच व्हॉट्सॲप अकाउंटवरून चॅट करू शकतात, ऑडिओ-व्हिडिओ कॉल करू शकतात, फोटो किंवा फाइल्स शेअर करू शकतात. त्याची प्रोसेस जाणून घेऊया.

advertisement

फक्त 799 रुपयांत मिळताय भारी Earbuds, 45 तास चालते बॅटरी

1. सर्वप्रथम, तुमच्या प्रायमरी फोनवर WhatsApp सुरू करा.

2. नंतर होम स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन व्हर्टिकल डॉट्सवर क्लिक करा.

3. यानंतर Linked devices ऑप्शनवर क्लिक करा आणि नंतर Link a device बटणावर क्लिक करा.

4. हे केल्यानंतर, तुमच्या फोनवर QR कोड स्कॅन उघडेल.

advertisement

5. यानंतर तुमच्या सेकेंड्री म्हणजेच दुसऱ्या फोनवर WhatsApp इन्स्टॉल करा.

6. नंतर स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन व्हर्टिकल डॉट्सवर क्लिक करा.

7. येथे तुम्ही Link as a Companion Device या ऑप्शनवर क्लिक करा.

8. त्यानंतर तुमच्या फोनवर एक QR कोड दिसेल. तुमच्या प्रायमरी फोनने ते स्कॅन करा.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

9. यानंतर तुमच्या दुसऱ्या फोनवरही पहिल्या फोनप्रमाणेच सर्व चॅट्स उघडतील.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
2 फोनमध्ये एकच WhatsApp अकाउंट कसं चालवायचं? जाणून घ्या सोपी प्रोसेस
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल