कॉलर ओळखा
अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कॉलवर नेहमी सतर्क रहा. कॉलरने बँक, सरकारी अधिकारी किंवा मोठ्या कंपनीचा प्रतिनिधी असल्याचा दावा केल्यास, त्यांच्या माहितीची पडताळणी करा.
पर्सनल माहिती शेअर करू नका
कोणत्याही कॉलवर तुमचा बँक अकाउंट नंबर, OTP, डेबिट/क्रेडिट कार्ड डिटेल्स किंवा आधार नंबर यासारखी माहिती कधीही देऊ नका. कोणतीही विश्वासार्ह संस्था फोनवर अशा प्रकारची माहिती विचारत नाही.
advertisement
Scammers ची नवी खेळी! बनावट कोर्ट ऑर्डरचा Email पाठवून लावताय चुना
ऑफर आणि प्राइजला बळी पडू नका
बनावट कॉल लॉटरी किंवा बक्षीस जिंकण्याचा दावा करतात. पुष्टी केल्याशिवाय कोणत्याही अज्ञात ऑफरवर विश्वास ठेवू नका.
कॉल ब्लॉक करा
तुमच्या मोबाईलमध्ये उपलब्ध कॉल ब्लॉकिंग फीचर वापरा. Truecaller सारख्या ॲप्सच्या मदतीने संशयास्पद नंबर ओळखा आणि ब्लॉक करा.
25 हजारांच्या बजेटमध्ये येतील भारी स्मार्टफोन्स! 2024 मध्ये राहिली खूप डिमांड
कॉल रेकॉर्ड करा आणि रिपोर्ट करा
तुम्हाला बनावट कॉलचा संशय असल्यास, तो रेकॉर्ड करा. या कॉलची तक्रार 1909 (DND हेल्पलाइन) किंवा सायबर क्राइम पोर्टलवर (https://cybercrime.gov.in) करा.
तुमचा मोबाईल आणि बँकेला अलर्ट करा
तुम्ही चुकून कोणतीही माहिती शेअर केली असेल, तर ताबडतोब तुमच्या बँक आणि मोबाइल सर्व्हिस प्रदात्याला कळवा. तुमचे बँक अकाउंट लॉक करा आणि नवीन पासवर्ड सेट करा. तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना बनावट कॉलच्या धोक्यांबद्दल सांगा. सायबर सुरक्षेशी संबंधित अपडेट्सकडे लक्ष द्या.
