TRENDING:

Google Chrome: गुगल क्रोमच्या या 10 ट्रिक अवश्य घ्या जाणून, ऑफिसमध्ये असाल सर्वात स्मार्ट

Last Updated:

गुगल क्रोम जास्तीत जास्त लोक वापरतात. गुगल क्रोम वापरत असताना काही ट्रिक्स माहिती असल्या तर तुमचं काम सोपं होईल. चला या ट्रिक्सविषयी जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : तुम्ही देखील गुगल क्रोम वापरत असाल आणि त्यात काही शंका नाही. गुगल क्रोम हा आज सर्वात जास्त वापरला जाणारा ब्राउझर आहे. Chrome ब्राउझरमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स आहेत जी तुमचा ब्राउझिंग अनुभव सुधारू शकतात. आज या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला काही शानदार टिप्स सांगणार आहोत.
क्रोम
क्रोम
advertisement

इंकॉग्निटो मोड - हा मोड तुम्हाला खाजगीरित्या ब्राउझ करण्याची परवानगी देतो. तुमचा ब्राउझिंग हिस्ट्री सेव्ह होत नाही आणि कुकीज स्टोर होत नाहीत. ते उघडण्यासाठी विंडोजमध्ये Ctrl + Shift + N दाबा.

ग्रुप टॅब - एकाच वेळी अनेक टॅब व्यवस्थित ठेवण्यासाठी टॅब ग्रुप वापरा. तुम्ही टॅब ग्रुप तयार करू शकता आणि त्याला रंगीत लेबल देखील देऊ शकता. टॅबवर राइट-क्लिक करा आणि Add to New Group निवडा.

advertisement

BSNL च्या सिमवर फ्री चालतील 300 लाइव्ह TV चॅनल्स! DTH कंपन्यांचं टेन्शन वाढलं

रीडिंग लिस्ट- तुम्ही कोणतीही वेबसाइट नंतर वाचण्यासाठी सेव्ह करू शकता. बुकमार्क बारमधील "Reading List" वापरा आणि त्यात कोणतेही पेज जोडा.

टॅब पिन करा - महत्वाचे टॅब पिन करा जेणेकरून ते नेहमी प्रथम दिसतील. टॅबवर राइट-क्लिक करा आणि "Pin" निवडा.

advertisement

सर्च बारमधून थेट कॅलक्युलेशन किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करा – क्रोमच्या अॅड्रेस बारमध्ये कॅलक्युलेशन, मुद्रा बदलणे किंवा प्रश्न विचारणंही शक्य आहे. उदाहरणार्थ : 10 USD to INR किंवा 5*20

AI चॅटबॉटला चुकूनही विचारु नका हे 5 प्रश्न! अन्यथा खावी लागेल जेलची हवा

टास्क मॅनेजर – क्रोमचा इनबिल्ट टास्क मॅनेजर तुम्हाला कोणता टॅब किंवा एक्स्टेंशन सर्वाधिक संसाधने वापरत आहे हे शोधण्यात मदत करतो. ते उघडण्यासाठी: Shift + Esc

advertisement

व्हॉइस सर्च – तुम्ही ॲड्रेस बारमधील मायक्रोफोन आयकन दाबून किंवा Google होमपेजवर व्हॉइस सर्च वापरू शकता.

डायरेक्टली सर्च करा - पेजवर शब्द किंवा वाक्यांश फास्ट शोधण्यासाठी Ctrl + F (Windows) किंवा Cmd + F (Mac) दाबा.

कास्ट फीचर - तुमच्याकडे Chromecast किंवा सपोर्टेड डिव्हाइस असल्यास तुम्ही तुमची ब्राउझर स्क्रीन तुमच्या टीव्हीवर कास्ट करू शकता. त्यात अॅक्सेस करण्यासाठी, राइट-क्लिक करा आणि "राइट-क्लिक" ऑप्शन निवडा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: कृषी मार्केटमध्ये उलटफेर, कांदा, केळीनं वाढवलं टेन्शन, लिंबू अन् द्राक्षांना किती मिळाला भाव?
सर्व पहा

वेबपेज PDF म्हणून सेव्ह करा - कोणतेही वेबपेज PDF म्हणून सेव्ह करण्यासाठी Ctrl + P (Windows) किंवा Cmd + P (Mac) दाबा आणि नंतर "Save as PDF" निवडा.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Google Chrome: गुगल क्रोमच्या या 10 ट्रिक अवश्य घ्या जाणून, ऑफिसमध्ये असाल सर्वात स्मार्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल