AI चॅटबॉटला चुकूनही विचारु नका हे 5 प्रश्न! अन्यथा खावी लागेल जेलची हवा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
AI Chatbot Illegal Questions: तुम्हीही एआय चॅटबॉट वापरत असाल तर हे 5 प्रश्न कधीही विचारू नका. असे केल्याने तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता.
AI Chatbot Illegal Questions: OpenAI ने ChatGPT सुरू केल्यापासून, आज अनेक कामं काही मिनिटांत करता येतात. नुकतेच गुगल, अॅपल आणि मायक्रोसॉफ्टनेही त्यांचे AI चॅटबॉट्स सादर केले आहेत. या चॅटबॉट्समधून तुम्हाला विविध आयडिया मिळतात. यासोबतच तुम्ही तुम्ही खूप काही शिकू शकता. एखाद्या गोष्टीबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला गुगलवर वेगवेगळ्या लिंक्सवर जाण्याची गरज नाही, फक्त एक कमांड आणि तुम्हाला सर्व माहिती मिळेल, पण तुम्हाला माहित आहे का की या AI चॅटबॉट्सवर तुम्ही हे 5 प्रश्न कधीही विचारू नयेत असे केल्यास तुरुंगातही जावे लागू शकते. चला याविषयी डिटेल्समध्ये जाणून घेऊया.
बेकायदेशीर कामांची माहिती
तुम्ही एआय चॅटबॉटकडून कोणत्याही बेकायदेशीर कामासाठी काही विचारत असाल तर तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता. असे केल्याने तुम्हाला ट्रॅक देखील केले जाऊ शकते.
हॅकिंग किंवा सायबर गुन्ह्यांशी संबंधित माहिती
तुम्ही AI चॅटबॉटला काही प्रश्न विचारत असाल जसे की सिस्टम हॅक करण्याचा प्रयत्न करणे किंवा डेटा चोरणे, तर चुकूनही असे करू नका. अशा स्थितीत AI चॅटबॉटची सिक्योरिटी सिस्टम तुम्हाला ब्लॉक करू शकते.
advertisement
हेटफूल आणि ओफ्फेन्सिव् कंटेन्ट
तुम्ही AI चॅटबॉटला जात, धर्म, लिंग किंवा इतर कोणत्याही आधारावर द्वेषपूर्ण आणि आक्षेपार्ह मजकूर लिहायला लावत असाल तर तुम्हीही मोठ्या अडचणीत येऊ शकता. चुकूनही हे करू नका.
पर्सनल माहिती
एआय चॅटबॉटसोबत तुमची पर्सनल माहिती कधीही शेअर करू नका. यामुळे तुमची किंवा इतर कोणाची पर्सनल माहिती लीक होऊ शकते. काही चॅटबॉट्स खूप सुरक्षित आहेत, तरीही तुम्ही हे करणे टाळले पाहिजे.
advertisement
राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती
तुम्ही AI चॅटबॉटला सीक्रेट सरकारी योजनांबद्दल विचारत असाल किंवा लष्कराशी संबंधित गुप्त माहिती जाणून घेण्यासाठी AI वापरत असाल तर असे अजिबात करू नका.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 30, 2024 12:55 PM IST







