500 च्या आत मिळतंय टिकाऊ इलेक्ट्रिक केटल! पहा कुठे सुरुये ऑफर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Electric Kettle Under Rs 500: या हिवाळ्यात परवडणारी टिकाऊ किटली विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या Amazon वरून मोठ्या डिस्काउंटमध्ये किटली खरेदी करू शकता.
Best Electric Kettle Under Rs 500: हिवाळ्यात केटलची मागणी खूप वाढते. पाणी गरम करण्यापासून ते चहा, कॉफी आणि नूडल्स बनवण्यासाठी केटल्सचा वापर अनेक प्रकारे करता येतो. जे लोक त्यांच्या घराबाहेर हॉस्टेल-पीजीमध्ये एकटे राहतात त्यांच्यासाठी केटल खूप उपयुक्त आहे. या हिवाळ्यात परवडणारी टिकाऊ केटल विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या Amazon वरून मोठ्या डिस्काउंटमध्ये केटल खरेदी करू शकता. या केटलची किंमत सध्या 500 रुपयांपेक्षा कमी आहे.
Longway Kestro 1.5 Ltr Electric Kettle with Stainless Steel
ही केटल Amazon वरून 489 रुपयांना 58 टक्के डिस्काउंटसह खरेदी करता येईल. तसे, या केटलची किंमत 1169 रुपये आहे. ही 1.5 लिटरची केटल आहे. ज्याची 1500W पॉवर क्षमता आहे. या केटलमध्ये पाणी गरम करण्यासोबतच तुम्ही चहा, कॉफी, नूडल्स, सूप इत्यादी बनवू शकता असा कंपनीचा दावा आहे.
advertisement
Indo 1.8 Ltr Multi Cook Electric Kettle with light Indicator
ही केटल Amazon वर 1899 रुपयांना लिस्ट करण्यात आली आहे, जी 74 टक्के डिस्काउंटसह 499 रुपयांना खरेदी केली जाऊ शकते. फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास, या केटलची क्षमता 1.8 लिटर आहे. तसेच यामध्ये सेफ्टी लाइट इंडिकेटर देण्यात आला आहे. या केटलमध्ये पाणी 2 ते 3 मिनिटांत गरम होते, असा कंपनीचा दावा आहे.
advertisement
ZOOV 2 Liter Electric Kettle with Stainless Steel Body for Boiling
या केटलची किंमत 899 रुपये आहे. जी सध्या Amazon वर 50 टक्के डिस्काउंटसह 449 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ही केटल 2 लिटर पाण्याच्या कॅपेसिटीसह येते. विशेष म्हणजे या केटलची किंमत फक्त 250 ग्रॅम आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 30, 2024 12:32 PM IST







