Instagram TV अॅपमध्ये काय खास आहे?
आतापर्यंत, टीव्हीवर इंस्टाग्राम पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवरून स्क्रीन मिररिंग किंवा कास्टिंगचा अवलंब करावा लागत असे. पण आता, गुगल टीव्हीसाठी हे समर्पित अॅप तुमचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकेल. या अॅपसह, तुम्ही आता मोठ्या स्क्रीनवर रील्सचा आनंद घेऊ शकता. तुम्ही तुमच्या टीव्ही रिमोटचा वापर करून पुढील रील्सवर सहजपणे स्विच करू शकता, थांबवू शकता किंवा व्हिडिओ प्ले करू शकता. टीव्ही अॅपची रचना मोबाईलपेक्षा खूपच स्वच्छ आहे, त्यामुळे दूरवरून पाहताना तुमच्या डोळ्यांवर ताण येत नाही.
advertisement
Spam Calls पासून बचाव करायचाय? WhatsAppच्या या सेटिंग करा ऑन
TV वर कसं करावं इंस्टॉल?
- तुमच्या जवळ Google TV, Android TV किंवा Chromecast आहे. तर तुम्ही या सोप्या स्टेप्सने सेटअप करु शकता.
- सर्वात आधी तुम्ही तुमच्या गूगल टीव्हीच्या होम स्क्रिनवर जा आणि 'Apps' टॅबमध्ये जाऊन Google Play Store ओपन करा.
- आता सर्च बारमध्ये 'Instagram' टाइप करा.
- आता येथे तुम्हाला 'Instagram for TV' चा ऑप्शन दिसेल.
- आता खाली 'Install' बटणवर क्लिक करा. काही सेकंदांमध्ये अॅप तुमच्या टीव्हीमध्ये डाउनलोड होईल.
- अॅप ओपन केल्यावर तुम्हाला QR Code दिसेल. तुमच्या फोनच्या इंस्टाग्राम अॅपने हे स्कॅन करा किंवा स्क्रिनवर दिसत असलेल्या कोडला instagram.com/activate वर जाऊन टाका.
- तुम्ही फोनने अप्रूव्ह केल्यानंतर तुमची इंस्टाग्राम फीड तुमच्या स्मार्ट टीव्हीवर ओपन होईल.
मोठ्या स्क्रीनवर पाहण्याचा आनंद घ्या
टीव्हीवर इंस्टाग्राम पाहणे हा लहान फोन स्क्रीनवर पाहण्यापेक्षा वेगळा अनुभव आहे. आता तुम्ही संपूर्ण कुटुंबासह रील्सचा आनंद घेऊ शकता. अॅप मोठ्या स्क्रीनसाठी सामग्री ऑटोमॅटिक अॅडजस्ट करेल आणि व्हिडिओ सतत प्ले होतील, रिमोटने वारंवार स्क्रोल करण्याची आवश्यकता नाही.
डिजिटल जगात बदल
इंस्टाग्रामचं हे पाऊल दाखवतं की, लोक आता लहान स्क्रीन ऐवजी मोठ्या स्क्रीनवर सोशल मीडियाचा अनुभव घेत आहेत. YouTube आणि TikTok पहिलेच टीव्हीवर उपलब्ध आहेत आणि आता इंस्टाग्रामही त्याच रांगेत आले आहे. या नव्या फीचरनंतर आता तुम्ही आरामात बसून फोन हातात न घेता सोशल मीडियाचा आनंद घेऊ शकता.
