TRENDING:

2025 मध्ये बदलणार Instagram! व्हिडिओ एडिट करण्यासाठी वापरता येईल AI Tools

Last Updated:

Instagram AI Video Tool: 2025 मध्ये इंस्टाग्रामवर एक मोठा बदल होणार आहे. आता तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित टूल्सद्वारे व्हिडिओ एडिट करू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Instagram AI Videos: 2024 हे वर्ष शेवटच्या टप्प्यावर आहे आणि लवकरच 2025 सुरु होणार आहे. अनेक नवीन बदलांचीही प्रतीक्षा आहे. 2024 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा महत्त्वाचा भाग बनलाय. त्याच वेळी, 2025 मध्ये ते अधिक अडव्हान्स होणार आहे. इंस्टाग्रामचे सीईओ ॲडम मोसेरी यांनी नवीन व्हिडिओ जनरेशन आणि नवीन व्हिडिओ एआय टूल्सची घोषणा केली आहे. सीईओच्या म्हणण्यानुसार, हे टूल 2025 पर्यंत आणले जाईल.
इंस्टाग्राम
इंस्टाग्राम
advertisement

90% लोकांना माहिती नाही iPhone चं ChatGPT हीडन फीचर! अनेक कामं होतील सोपी

रील व्हिडिओंमध्ये वेगवेगळे बदल केले जाऊ शकतात

ॲडम मोसेरीने एआय टूलचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी ते कसे चालेल हे सांगितले आहे. मोसेरीने शेअर केलेल्या रील व्हिडिओमध्ये वेगवेगळे बदल दाखवण्यात आले आहेत. या नवीन एआय टूलद्वारे तुम्ही बॅकग्राउंड सेटिंग्ज बदलू शकता. याशिवाय तुम्ही आउटफिटही बदलू शकता. एखाद्या व्यक्तिरेखेमध्ये ॲक्सेसरीज कसे जोडता येतील हे देखील व्हिडिओ दाखवते.

advertisement

Jio बेस्ट एंटरटेनमेंट प्लॅन पाहिलाय का? मिळतात 10 पेक्षाही जास्त OTT सब्सक्रिप्शन

एआय मेटाच्या Movie Zen वर आधारित असेल

मोसेरीने एका व्हिडिओमध्ये सांगितले की, व्हिडिओमध्ये दाखवलेले इफेक्ट सुरुवातीच्या व्हिडिओ मॉडेलद्वारे तयार केले गेले आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामची पॅरेंट कंपनी मेटाला आशा आहे की ही टूल्स 2025 मध्ये कंटेन्ट निर्मात्यांना उपलब्ध करून दिली जातील. व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यूझर्सना हे टूल्स सहज वापरता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे की, हे टूल मेटाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वर आधारित आहे ज्याचे नाव Movie Zen आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे भाव पुन्हा कोसळले, लिंबू आणि केळीची काय स्थिती? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

Movie Zen ऑक्टोबरमध्ये सादर करण्यात आला होता. हे मॉडेल Google आणि OpenAI द्वारे विकसित केलेल्या व्हिडिओ जनरेशन मॉडेलसारखेच आहे.

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
2025 मध्ये बदलणार Instagram! व्हिडिओ एडिट करण्यासाठी वापरता येईल AI Tools
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल