जिओचा 899 रुपयांचा प्लॅन
जिओच्या या 899 रुपयांच्या प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. हे कोणत्याही नेटवर्कवर विनामूल्य आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. 20GB अतिरिक्त डेटाही दिला जात आहे. यासोबतच यूजर्सना दररोज 100 फ्री SMSचाही लाभ मिळतो. जिओचा हा प्लॅन बजेट फ्रेंडली ऑप्शनमध्ये येतो.
ट्रॅफिक चालानच्या नावावर होतंय मोठा स्कॅम! तुम्हीही करताय का ही चूक?
advertisement
999 रुपयांचा प्लॅन
जिओचा 999 रुपयांचा प्लॅन 98 दिवसांची व्हॅलिडिटी देतो. यामध्ये यूजर्सना रोजचा 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचे फायदे मिळतात. यासोबतच यूजर्सना दररोज 100 फ्री एसएमएस मिळतात. या प्लॅनमध्ये JioTV आणि JioCinema चे मोफत सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.
BSNL चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
BSNL च्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची किंमत 1,198 रुपये आहे. या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवस किंवा 12 महिने आहे. या प्लॅनच्या फायद्यांबद्दल सांगायचे तर, यूझर्सना देशभरातील कोणत्याही नंबरवर कॉल करण्यासाठी दर महिन्याला 300 फ्री मिनिटे दिली जातात. याशिवाय या प्लॅनमध्ये लोकांना दर महिन्याला 3GB हाय स्पीड 3G/4G डेटा मिळतो. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये यूजर्सना दर महिन्याला 30 फ्री एसएमएसची सुविधाही मिळते.
स्कॅमर्स आणि फ्रॉडस्टर्सवर येणार संकट! डिसेंबरपासून मिळणार नाही OTP
BSNL ने आपल्या 365 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनची किंमतही कमी केली आहे. कंपनीने या प्लॅनची किंमत 100 रुपयांनी कमी केली आहे. याच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर कंपनीच्या या प्लॅनमध्ये लोकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. यामध्ये यूजर्सला कोणत्याही डेली लिमिटशिवाय एकूण 600GB डेटा मिळतो. याशिवाय प्लॅनमध्ये यूझर्सना दररोज 100 मोफत एसएमएस देखील दिले जातात. या प्लॅनची किंमत आधी 1999 रुपये होती जी आता 1899 रुपये झाली आहे. ज्या लोकांना त्यांचे बीएसएनएल सिम अॅक्टिव्ह ठेवायचे आहे आणि ते दुय्यम सिम म्हणून वापरायचे आहे त्यांच्यासाठी ही योजना अधिक चांगली मानली जाते.
