TRENDING:

Jio च्या 'या' दोन प्लान्समध्ये फक्त 1 रुपयाचा फरक; एक रुपयात असं काय देतेय कंपनी?

Last Updated:

Jio च्या 'या' दोन प्लान्समध्ये फक्त 1 रुपयाचा फरक; एक रुपयात असं काय देतेय कंपनी?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जिओ कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नेहमी वेगवेगळे रिचार्ज प्लॅन्स घेऊन येत असते. ग्राहकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी आकर्षक ऑफर्स कंपनी देते. जिओनं सध्या ग्राहकांसाठी दोन स्वस्त प्लॅन्स आणले आहेत. या दोन्ही प्लॅन्समध्ये केवळ एक रुपयाचा फरक आहे. त्या एक रुपयात कंपनी ग्राहकांना काय वेगळं देणार आहे ते जाणून घेऊ या.
सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
advertisement

ज्यांना स्वस्त प्लॅन हवा आहे, ज्यांना ओटीटी सबस्क्रिप्शन हवं आहे, ज्यांना फक्त डेटा हवा आहे, ज्यांना डेटा जास्त हवा आहे अशा सर्व ग्राहकांसाठी जिओचे प्लॅन्स असतात. ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी कंपनी आकर्षक प्लॅन्स घेऊन येत असते. जिओनं काही दिवसांपूर्वी आपल्या प्लॅन्सची किंमत वाढवली होती. आता कंपनीनं दोन नवे प्लॅन्स जाहीर केले आहेत. या दोन्ही प्लॅन्समध्ये केवळ एक रुपयाचाच फरक आहे; मात्र त्या एक रुपयामध्ये कंपनीने ग्राहकांना कोणत्या वेगळ्या सुविधा दिल्या आहेत, ते जाणून घेऊ या.

advertisement

ग्राहकांना स्वस्त आणि अधिक व्हॅलिडिटी असणारे प्लॅन्स देण्यासाठी जुलै महिन्यानंतर कंपनीनं अनेक नवे प्लॅन्स जाहीर केले आहेत. यात दोन प्लॅन्स असे आहेत, ज्यामध्ये केवळ एका रुपयाचा फरक आहे; मात्र त्यात नेमकं वेगळं काय आहे, हे अनेक ग्राहकांच्या लक्षात येत नाही.

जिओचा पहिला प्लॅन 1028 रुपयांचा आहे. हा प्लॅन 84 दिवसांचा आहे. म्हणजेच अंदाजे तीन महिन्यांसाठी ग्राहकांना ती ऑफर मिळते. या प्लॅनमध्ये फ्री कॉलिंग, दररोज 100 फ्री एसएमएस आणि दररोज 2GB डेटा ग्राहकांना मिळतो. याचा अर्थ 84 दिवसांसाठी 168GB डेटा मिळतो. तसंच जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउडचं सबस्क्रिप्शनही मिळतं. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये ग्राहकांना 50 रुपयांच्या कॅशबॅकची ऑफर मिळते.

advertisement

जिओचा दुसरा प्लॅन 1029 रुपयांचा आहे. आधीच्या प्लॅनपेक्षा हा प्लॅन केवळ एक रुपयाने महाग आहे. यातदेखील ग्राहकांना 84 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. फ्री अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा, दररोज 100 फ्री एसएमएस आणि 2GB हाय स्पीड डेटा दररोज मिळतो. आधीच्या प्लॅनप्रमाणे यातही जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउडचं सबस्क्रिप्शन मिळतं.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

जास्तीच्या घेतलेल्या एक रुपयात जिओकडून ग्राहकांना अ‍ॅमेझॉन प्राइम लाइटचं सबस्क्रिप्शन मिळतं. म्हणजेच केवळ एका रुपयात तुम्ही अ‍ॅमेझॉन प्राइमचे सदस्य बनू शकता. या मेंबरशिपमुळे वस्तूंची घरपोच डिलिव्हरी केवळ दोन दिवसांत मिळू शकते. तसंच नियोजित डिलिव्हरीचा पर्यायही तुम्हाला उपलब्ध होतो. थोडक्यात दुसरा प्लॅन घेतल्यामुळे केवळ एक रुपयात अनेक सुविधांचा लाभ ग्राहकांना होऊ शकतो.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Jio च्या 'या' दोन प्लान्समध्ये फक्त 1 रुपयाचा फरक; एक रुपयात असं काय देतेय कंपनी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल