TRENDING:

फेब्रुवारीमध्ये एंट्री मारणार हे 5 धुरंधर स्मार्टफोन! लिस्टमध्ये सॅमसंगसह आयफोनचाही समावेश 

Last Updated:

फेब्रुवारी 2026 मध्ये भारतात अनेक मोठे स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत.Samsung Galaxy S26 सीरीज, iPhone 17e, Vivo V70, iQOO 15R आणि Motorola Edge 70 Fusion सारखे फोन्स फीचर्स आणि किंमतीत एकमेकांना टक्कर देतील.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : फेब्रुवारी 2026 भारतातील स्मार्टफोन बाजारासाठी खुप इंट्रेस्टिंग राहणार आहे. या महिन्यात अनके मोठ्या कंपन्या आपल्या नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. विशेष म्हणजे, यावेली फ्लॅगशिपपासून तर प्रीमियम मिड-रेंजपर्यंत प३त्येक सेगमेंटमध्ये नवीन ऑप्शन पाहायला मिळतील. सॅमसंग, अ‍ॅपल, विवो, iQOO आणि मोटोरोला सारख्या कंपन्या फेब्रुवारीमध्ये यूझर्सना नवीन फोनने सरप्राइज देऊ शकतात.
स्मार्टफोन
स्मार्टफोन
advertisement

Vivo V70, Vivo V70 Elite: सर्वात पहिले आपण विवो कंपनीविषयी बोलणार आहोत. कंपनी फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत आपली v-सीरीज अपडेट करत Vivo V70 आणि Vivo V70 Elite लॉन्च करु शकते. Vivo ची ही सीरीज नेहमीपासून डिझाइन आणि कॅमेरा क्वालिटीवर फेकस करत आलेली आहे. नवीन मॉडल्सकडूनही ही अपेक्षा केली जात आहे. सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, दोन्ही फोनची किंमत 55,000 रुपयांहून कमी असु शकते. ज्यामुळे हे प्रीमियम मिड-रेंज यूझर्सला टार्गेट करतील.

advertisement

iQOO 15R: त्यानंतर iQOO 15R येतो, जो 24 फेब्रुवारी रोजी भारतात लाँच होण्याची अपेक्षा आहे. हा iQOO चा 'R' ब्रँडिंग असलेला पहिला फोन असेल. यात स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 प्रोसेसर असण्याची अपेक्षा आहे, जो कमी किमतीत फ्लॅगशिप सारखा परफॉर्मेंस देण्याचे आश्वासन देतो. गेमिंग आणि पॉवर यूझर्ससाठी हा एक मजबूत ऑप्शन असू शकतो.

advertisement

Motorola Edge 70 Fusion: मोटोरोलाही मागे नाही. कंपनी फेब्रुवारीच्या मध्यात Motorola Edge 70 Fusion लॉन्च करण्याची अपेक्षा आहे. रिपोर्टनुसार यात 6.78-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले, 144Hz रिफ्रेश रेट, Snapdragon 7s Gen 4 प्रोसेसर आणि 7,000mAh ची मोठी बॅटरी असू शकते. IP68 आणि IP69 रेटिंग देखील मजबूती आणि टिकाऊपणासाठी अपवादात्मक बनवू शकतात.

advertisement

Samsung Galaxy S26: फेब्रुवारीचा सर्वात मोठा लॉन्च Samsung Galaxy S26 सीरीज असू शकते. यामध्ये Galaxy S26, S26+  आणि S26 Ultra सामिल होण्याची अपेक्षा आहे. सॅमसंग यावेळी मोठ्या डिझाइन बदलाऐवजी, बेस्ट कॅमेरा, दमदार प्रोसेसर आणि डिस्प्ले सुधारणेवर फोकस करु शकतो. Galaxy Unpacked 2026 इव्हेंट 25 फेब्रुवारीला होण्याची चर्चा आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ट्रॅक्टर खरेदीवर मिळतंय अनुदान, लगेच करा अर्ज, कोणती लागतील कागदपत्रे?
सर्व पहा

Apple देखील या शर्यतीत सामील होऊ शकते. रिपोर्ट्सनुसार iPhone 17e फेब्रुवारीच्या अखेरीस लाँच होऊ शकतो. हा iPhone 16e सारखाच थोडा स्वस्त आयफोन असेल आणि त्यात A19 चिप आणि फेस आयडी असण्याची अपेक्षा आहे. भारतात त्याची किंमत 64,999 रुपयांपेक्षा कमी असू शकते. एकूणच, फेब्रुवारी 2026 स्मार्टफोन खरेदीदारांसाठी अनेक नवीन आणि दमदार पर्याय ऑप्शन येत आहे.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
फेब्रुवारीमध्ये एंट्री मारणार हे 5 धुरंधर स्मार्टफोन! लिस्टमध्ये सॅमसंगसह आयफोनचाही समावेश 
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल