संचार साथी अॅप फक्त नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या सिम कार्ड/फोनशी संबंधित संभाव्य फसवणूक रोखण्यासाठी डिझाइन केला आहे. वैयक्तिक माहिती गोळा करण्याचा किंवा त्यांच्या गोपनीयतेशी तडजोड करण्याचा हेतू नाही, असंही ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट केलं.
केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिल्यानंतर आता, संचार साथी अॅप डाउनलोड करणं लोकांसाठी पर्याय असणार आहे. Sanchar Saathi App फोनमध्ये ठेवणं किंवा काढून टाकणं हा देखील युझर्सचा निर्णय असणार आहे. Sanchar Saathi App हा मोबाईलमध्ये कायम स्वरूपी असणार, याबद्दल कोणतेही निर्देश केंद्र सरकारने दिले नाही. भारत सरकारने अलीकडेच स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपन्यांना सर्व नवीन मोबाइल फोनमध्ये Sanchar Saathi App प्री-इंस्टॉल करण्याचे आणि ते न काढता येणार नाही, असे निर्देश दिले होते.
advertisement
हा आदेश दूरसंचार विभागाने (DoT) सोमवारी जारी केला होता. या अंतर्गत, प्रत्येक नवीन हँडसेटमध्ये Sanchar Saathi App अॅप प्री-इंस्टॉल केलेलं असणं आवश्यक आहे, तर सध्याच्या डिव्हाइसेस सॉफ्टवेअर अपडेटद्वारे उपलब्ध करून दिले जातील. उत्पादकांना या निर्देशाचे पालन करण्यासाठी तीन महिन्याची मुदत दिली होती.
Sanchar Saathi App म्हणजे काय?
Sanchar Saathi App हा एक केंद्र सरकारचा सायबर सेफ अॅप आहे, जो वापरकर्त्यांना स्पॅम कॉल, फेक मेसेज आणि चोरीला गेलेले मोबाइल फोनची तक्रार करण्यासाठी फायदेशीर असणार आहे. Sanchar Saathi App हा जानेवारी २०२५ मध्ये लाँच केला होता आणि ऑगस्टपर्यंत ५० लाखांहून अधिक वेळा डाउनलोड केला गेला आहे. सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या सरकारी निवेदनानुसार, या प्लॅटफॉर्मद्वारे ३७.२८ लाखांहून अधिक हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाइल फोन ब्लॉक करण्यात आले, तर २२.७६ लाख डिव्हाइसेस ट्रेस करण्यात आले.
Sanchar Saathi App चं वेगळं पण काय?
-IMEI नंबर वापरून चोरीला गेलेले फोन शोधणे आणि ब्लॉक करणे
-प्रत्येक मोबाइल फोनमध्ये १५-अंकी आयएमईआय नंबर असतो, ज्यामुळे डिव्हाइस ओळखणे आणि ट्रॅक करणे - शक्य होते.
- पोलीस तपासात मदत: चोरीला गेलेल्या किंवा संशयास्पद फोनची माहिती पोलिसांना उपयुक्त ठरू शकते.
-फेक किंवा स्पॅम कॉल आणि मेसेजची तक्रार करणे: वापरकर्ते अॅपद्वारे स्पॅम कॉल, एसएमएस किंवा व्हॉट्सअॅप संदेशांची तक्रार करू शकतात.
-बनावट फोन थांबवण्यास मदत करणे: बनावट मोबाइल फोनचा प्रसार थांबवण्यास हा अॅप मदत करेल.
