TRENDING:

कोट्यवधी मोबाईल यूझर्ससाठी मोठी बातमी, या लोकांना मिळणार नाही सिम; यात तुम्ही आहात?

Last Updated:

2025 मध्ये सिम कार्ड धारकांसाठी बरेच काही बदलणार आहे. सरकार एक ब्लॅक लिस्ट तयार करत आहे. या लिस्टमध्ये कोणाचा समावेश केला जाणार आहे चला पाहूया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : देशातील कोट्यवधी मोबाईल यूझर्सना सायबर फ्रॉडपासून दिलासा देण्यासाठी सरकारने पूर्ण तयारी केली आहे. सरकारने अशा लोकांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे ज्यांना पुन्हा सिम कार्ड दिले जाणार नाहीत. नवीन सिम कार्ड नियमांतर्गत दूरसंचार विभागाने (DoT) कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अलीकडे, ट्रायच्या नवीन नियमांनुसार, बनावट कॉल आणि एसएमएसला आळा घालण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. तक्रार केल्यानंतर लाखो मोबाईल नंबर ब्लॉक करण्यात आले आहेत.
सिम
सिम
advertisement

CNBC Awaaz च्या रिपोर्टनुसार, दूरसंचार विभागाने सायबर गुन्हे रोखण्यासाठी ब्लॅकलिस्ट बनवण्यास सुरुवात केली आहे. सरकार याप्रकरणी कठोर कारवाई करण्याच्या मनस्थितीत आहे. रिपोर्टनुसार, जे दुसऱ्याच्या नावाने सिम कार्ड जारी करतात किंवा फसवे मेसेज पाठवतात ते आता सुरक्षित नाहीत. सरकार त्यांच्यावर कडक कारवाई करेल. अशा यूझर्सना सायबर सुरक्षा धोक्यात आणणाऱ्या श्रेणीत टाकले जाईल.

advertisement

'या' देशांकडे Fastest Internet, टॉप 10 यादीत अमेरिका किंवा इंग्लंड नाही, मग भारताचा नंबर कितवा?

3 वर्षांपर्यंत बंदी घालण्यात येईल

अशा यूझर्सना ब्लॅक लिस्टमध्ये टाकून, सिम कार्ड ब्लॉक केले जाईल. तसेच त्यांच्या नावावर 6 महिने ते 3 वर्षांपर्यंत कोणतेही कनेक्शन दिले जाणार नाही. नवीन नियमांनुसार दुसऱ्याच्या नावाने सिमकार्ड देणे गुन्हा आहे. याशिवाय फेक मेसेज पाठवणे देखील दंडनीय गुन्ह्याच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे.

advertisement

सिम कार्ड जारी केले जाणार नाहीत

2025 पासून, अशा यूझर्सची नावे ब्लॅक लिस्टमध्ये टाकली जातील आणि सर्व दूरसंचार ऑपरेटरसह शेअर केली जातील, जेणेकरून त्यांच्या नावे पुन्हा सिम कार्ड जारी केले जाणार नाहीत. सायबर सुरक्षा नियमांनुसार, सरकारने रिपोजिटरी ऑफ पर्सन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा यूझर्सची लिस्ट तयार केल्यानंतर, त्यांना सरकारकडून एक नोटीस पाठवली जाईल, ज्यावर त्यांना 7 दिवसांच्या आत उत्तर द्यावे लागेल.

advertisement

बापे रे... इतका महाग TV, ज्याच्या किमतीत 2BHK फ्लॅट येईल, LG ची टेक्नोलॉजी पाहून ग्राहक चकीत

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
एका अखंड दगडात कोरलेलं मंदिर, दगडी शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना, पुण्यातील राष्ट्रकूट वंश काळातील लेणी
सर्व पहा

सार्वजनिक हिताच्या बाबींमध्ये सरकार सूचना न देताही कारवाई करू शकते. अशा स्थितीत 6 महिने ते 3 वर्षांपर्यंत नवीन सिमकार्ड दिले जाणार नाही. सरकारने या वर्षी नोव्हेंबरमध्ये सायबर सुरक्षेशी संबंधित हे नियम अधिसूचित केले होते. त्यात अनेक नवीन तरतुदी जोडल्या गेल्या आहेत, ज्याचा वापर करून सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
कोट्यवधी मोबाईल यूझर्ससाठी मोठी बातमी, या लोकांना मिळणार नाही सिम; यात तुम्ही आहात?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल