advertisement

'या' देशांकडे Fastest Internet, टॉप 10 यादीत अमेरिका किंवा इंग्लंड नाही, मग भारताचा नंबर कितवा?

Last Updated:

Fastest Internet using county list : फास्टेस्ट इंटरनेट वापरणाऱ्या देशांची यादी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. कारण पहिल्या दहाच्या यादीत ना अमेरिकेचे नाव आहे ना ब्रिटनचे नाव आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : केवळ भारतातच नाही तर जगभरात इंटरनेटचा वापर वाढत आहे. विशेषत: मोबाईल इंटरनेटचा वापर खूप वाढला आहे. मात्र, प्रत्येक देशात मोबाईलवरील इंटरनेटचा वेग वेगळा असतो. स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्सने 2024 या वर्षात कोणत्या देशातील लोकांनी सर्वात वेगवान इंटरनेट स्पीडचा आनंद लुटला याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
यामध्ये देशांची क्रमवारी यादी जाहीर केली आहे, ज्यात कोणत्या देशाने सर्वात वेगवान इंटरनेट वापरलं त्यांची नावं आहे.
पण फास्टेस्ट इंटरनेट वापरणाऱ्या देशांची यादी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. कारण पहिल्या दहाच्या यादीत ना अमेरिकेचे नाव आहे ना ब्रिटनचे नाव. याता तुमची उत्सुक्ता नक्कीच वाढली असेल की जर या यादीत युएस किंवा ब्रिटन नाही मग कोणते देश पुढे आहेत? चला यादी पाहू, यात भारत कुठे आहे हे देखील जाणून घेऊया…
advertisement
मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत टॉप 10 देश कोणते आहेत?
1. संयुक्त अरब अमिराती: 442 (Mbps)
2. कतार: 358 (Mbps)
3. कुवेत: 264 (Mbps)
4. बल्गेरिया :172 (Mbps)
5. डेन्मार्क: 162 (Mbps)
6. दक्षिण कोरिया: 148 (Mbps)
7. नेदरलँड: 147 (Mbps)
8. नॉर्वे: 145.74 (Mbps)
9. चीन: 139.58 (Mbps)
10. लक्झेंबर्ग: 134.14 (Mbps)
advertisement
ही यादी पाहून जगभरातील इंटरनेट स्पीडमध्ये किती तफावत आहे याचा अंदाज लावता येईल. काही देश डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर देखील स्थापित करू शकत नाहीत, असे काही देश आहेत ज्यात इंटरनेट सुविधा आहेत ज्या संपूर्ण जगाच्या सरासरी इंटरनेट गतीपेक्षा वेगवान आहेत.
भारत हे चीननंतर जगातील दुसरे सर्वात मोठे ऑनलाइन बाजार आहे. आकडेवारीनुसार, देशातील इंटरनेट प्रवेश जागतिक सरासरीपेक्षा 50% पेक्षा जास्त आहे. तरीही स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्सनुसार, नोव्हेंबर 2024 पर्यंत, मोबाईल इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत जगभरात 25 व्या क्रमांकावर असेल.
advertisement
देशाची सरासरी डाउनलोड गती 100.78 Mbps आहे, अपलोड गती 9.08 Mbps आहे आणि लेटन्सी 30 ms आहे. भारतीय इंटरनेटचा वेग काही काळापूर्वी सुधारला असला तरी ते अजूनही अनेक देशांच्या मागे आहेत.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
'या' देशांकडे Fastest Internet, टॉप 10 यादीत अमेरिका किंवा इंग्लंड नाही, मग भारताचा नंबर कितवा?
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement