सध्या ऑनलाइन मार्केटमध्ये स्मार्ट टीव्हीवर बंपर ऑफर्स दिल्या जात आहेत. डिस्काउंट ऑफरमुळे तुम्हीही नवीन टीव्ही खरेदी करणार असाल तर स्मार्ट टीव्ही खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. अनेक वेळा, स्मार्ट टीव्ही खरेदी करताना, लोक फक्त मोठ्या स्क्रीनकडे पाहतात आणि त्याच्या इतर फीचर्सकडे दुर्लक्ष करतात. तुम्हीही असे केल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
advertisement
5G आणण्यापूर्वी Viने दिला Jio ला झटका! पुन्हा सुरु केला हा भारी रिचार्ज प्लॅन
मोठ्या स्क्रीनसह, अशी अनेक फीचर्स आहेत जी प्रत्यक्षात स्मार्ट टीव्हीला स्मार्ट बनवतात आणि ही फीचर्स व्हिडिओ स्ट्रीमिंगचा एक वेगळा आनंद देखील देतात. स्मार्ट टीव्ही खरेदी करताना डिस्प्ले व्यतिरिक्त कोणत्या फीचर्सकडे लक्ष देणे आवश्यक आहे आपण जाणून घेऊया.
डिस्प्ले पॅनेल टेक्नॉलॉजी
खराब पॅनेलचा मोठ्या स्क्रीन आकाराचा स्मार्ट टीव्ही तुमची व्हिडिओ स्ट्रीमिंगची मजा खराब करू शकतो. अशा परिस्थितीत, खरेदी करताना स्मार्ट टीव्हीच्या पॅनेलकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. LED पॅनेल असलेले स्मार्ट टीव्ही हे सर्वात सामान्य आणि स्वस्त आहेत, तर तुम्हाला OLED पॅनेल असलेल्या स्मार्ट टीव्हीमध्ये चांगले रंग पाहायला मिळतात. तर OLED पॅनल असलेले स्मार्ट टीव्ही सर्वात महाग आहेत. यामध्ये तुम्हाला अचूक रंग आणि अधिक ब्राइटनेस पाहायला मिळतात. जर तुमचे बजेट चांगले असेल तर तुम्ही QLED पॅनल असलेला स्मार्ट टीव्ही खरेदी करावा.
WhatsApp वर तुम्हीही ओळखू शकता बनावट फोटो! या फीचरने होईल काम
स्मार्ट फीचरकडे लक्ष द्या
स्मार्ट टीव्हीला स्मार्ट तिचे फीचर्स बनवतात. अशा परिस्थितीत, खरेदी करताना तुम्ही त्याच्या स्मार्ट फीचर्सकडे नक्कीच लक्ष दिले पाहिजे. सर्व प्रथम तुम्हाला त्याच्या ऑपरेटिंग सिस्टमबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. सध्या Android TV, WebOS, Tizen यांसारख्या काही लोकप्रिय ऑपरेटिंग सिस्टिम आहेत. याशिवाय स्मार्ट टीव्हीवर गुगल असिस्टंट किंवा अलेक्सासारखे व्हॉईस असिस्टंटचे फीचर असणेही आवश्यक आहे. त्याच्या मदतीने तुम्ही दूरवर बसून टीव्ही सहज कंट्रोल करू शकता.
कनेक्टिव्हिटी आणि पोर्टकडे लक्ष द्या
स्मार्ट टीव्ही खरेदी करताना त्याची कनेक्टिव्हिटी आणि पोर्ट्स लक्षात ठेवायला हवे. वेगवेगळ्या स्मार्ट टीव्हीवर कनेक्टिव्हिटी ऑप्शन वेगळे असतात. स्मार्ट टीव्हीवर HDMI आणि USB पोर्टचे किमान 2-3 ऑप्शन असले पाहिजेत. याशिवाय, तुम्ही त्यातील ब्लूटूथ आणि वायफाय व्हर्जन देखील चेक करा.
साउंट आउटपुट अवश्य तपासा
एक लो क्वालिटी साउंड संपूर्ण व्हिडिओ स्ट्रीमिंग खराब करतो. अशा परिस्थितीत तुम्ही स्मार्ट टीव्हीवर उपलब्ध साउंड आउटपुट नक्कीच तपासले पाहिजे. तुम्ही स्मार्ट टीव्ही खरेदी करणार असाल, तर तुम्ही कमीत कमी 30W चा साउंड आउटपुट असलेला स्मार्ट टीव्ही घ्यावा. याशिवाय स्मार्ट टीव्हीवर डॉल्बी ऑडिओची सुविधा असणेही आवश्यक आहे.
RAM आणि स्टोरेज देखील चेक करा
स्मार्टफोनप्रमाणेच आता स्मार्ट टीव्हीवरही रॅम आणि स्टोरेज दिले जाते. वेगवेगळ्या स्मार्ट टीव्हीवर वेगवेगळी रॅम आणि स्टोरेज पुरवले जाते. अधिक RAM सह, आपण टीव्हीवर अधिक अॅप्लिकेशन्सला टीव्हीवर इंस्टॉल करु शकतो. म्हणून आपण नेहमी अधिक RAM असलेला स्मार्ट टीव्ही निवडावा. तुम्हाला तुमच्या टीव्हीवर 32GB स्टोरेज मिळाल्यास तुमची अनेक कामे खूप सोपी होतील.
