advertisement

5G आणण्यापूर्वी Viने दिला Jio ला झटका! पुन्हा सुरु केला हा भारी रिचार्ज प्लॅन

Last Updated:

यापूर्वी Vodafone Idea कंपनीच्या प्लॅनची ​​किंमत 719 रुपये होती. मात्र आता त्याची किंमत 859 रुपये करण्यात आली आहे. पण आता एक चांगली बातमी आहे. Vodafone Idea ने हा प्लॅन पुन्हा सुरु केला आहे आणि त्याची किंमत देखील 719 रुपये आहे.

रिचार्ज प्लॅन
रिचार्ज प्लॅन
मुंबई : Jio, Airtel आणि Vi सारख्या देशातील बड्या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या मोबाईल प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. या कंपन्यांनी काही जुन्या योजना बंद केल्या आहेत आणि इतर योजनांचे फायदे कमी केले आहेत. यापूर्वी Vodafone Idea कंपनीच्या प्लॅनची ​​किंमत 719 रुपये होती. मात्र आता त्याची किंमत 859 रुपये करण्यात आली आहे. पण आता एक चांगली बातमी आहे, Vodafone Idea ने हा प्लॅन पुन्हा सुरु केला आहे आणि त्याची किंमत देखील 719 रुपये आहे. या नवीन प्लॅनमध्ये काय उपलब्ध आहे ते जाणून घेऊया.
Vi Rs 719 Recharge Plan
Vodafone Idea चा 719 रुपयांचा प्लॅन चांगला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 1GB डेटा मिळेल. पण एकदा दैनंदिन 1GB डेटा संपला की, तुमचे इंटरनेट स्लो होईल आणि तुम्हाला फक्त 64 Kbps स्पीड मिळेल. यापूर्वी, या प्लॅनमध्ये 84 दिवसांची व्हॅलिडिटी, प्रतिदिन 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि Vi Hero Unlimited चे फायदे होते.
advertisement
एक गोष्ट लक्षात ठेवा की, Vi Hero Unlimited चे फायदे 719 रुपयांच्या नवीन प्लॅनमध्ये मिळणार नाहीत. यापूर्वी हे फायदे या प्लॅनमध्ये उपलब्ध होते. पण 859 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 12 दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडिटी, दररोज अधिक डेटा आणि Vi Hero Unlimited चे फायदे मिळतील. म्हणजेच 859 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 140 रुपये जास्त द्यावे लागतील, परंतु तुम्हाला अधिक फायदेही मिळतील.
advertisement
5G सर्व्हिस लवकरच येत आहे
याशिवाय Vodafone Idea देखील लवकरच 5G सेवा सुरू करणार आहे. याआधी जिओ आणि एअरटेलने देशातील अनेक भागात 5जी सेवा सुरू केली आहे. Vodafone Idea गेल्या काही वर्षांपासून 5G टेक्नॉलॉजीवर काम करत आहे आणि आता ते लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, Vodafone Idea मार्चमध्ये 5G सेवा सुरू करेल, जी पहिल्यांदा दिल्ली, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये सुरू होईल.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
5G आणण्यापूर्वी Viने दिला Jio ला झटका! पुन्हा सुरु केला हा भारी रिचार्ज प्लॅन
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement