Samsung Galaxy M35 5G
या फोनमध्ये 1080 x 2340 रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.6 इंच सुपर AMOLED डिस्प्ले आहे. त्याच्या प्रोटेक्शनसाठी, ते कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ ने सुसज्ज आहे. हा फोन Exynos 138 प्रोसेसर सह येतो. कंपनी 4 जनरेशन अँड्रॉइड अपडेट्स आणि 5 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देईल. यात 50MP मेन वाइड अँगल कॅमेरा आहे. त्याच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह व्हेरिएंटची किंमत Amazon वर 14,999 रुपये आहे. यावर कॅशबॅक आणि नो कॉस्ट ईएमआय ऑफर उपलब्ध आहेत.
advertisement
2 फोनमध्ये एकच WhatsApp अकाउंट कसं चालवायचं? जाणून घ्या सोपी प्रोसेस
CMF BY NOTHING Phone 1 5G
या फोनमध्ये 120Hz ॲडॉप्टिव्ह रिफ्रेश रेटसह 6.55 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. यात 50MP मुख्य सेन्सर आणि मागील बाजूस पोर्ट्रेट सेन्सर आहे. सेल्फीसाठी यात 16MP कॅमेरा आहे. यात 5000mAh ची पॉवरफुल बॅटरी आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर ते MediaTek Dimension 7300 5G ने सुसज्ज आहे. त्याचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 14,325 रुपयांना उपलब्ध आहे. यावर तुम्ही बँक ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआयचा लाभ घेऊ शकता.
फक्त 799 रुपयांत मिळताय भारी Earbuds, 45 तास चालते बॅटरी
Vivo T3x 5G
Vivo चा हा स्मार्टफोन 6.72 फुल HD+ डिस्प्ले सह येतो. यात मागील बाजूस 50MP + 2MP सेन्सर आहेत, तर सेल्फी प्रेमींसाठी, हे 8MP फ्रंट कॅमेरासह येतात. यात 6000 mAh ची बॅटरी आहे. त्याच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हर्जनची Amazon वर किंमत 14,449 रुपये आहे. यावर बँक ऑफर आणि इतर डील देखील मिळू शकतात.
