TRENDING:

google : तुमच्याकडे 'हा' फोन असेल तर बसेल फटका, गुगलने 'त्या' Apps बद्दल घेतला मोठा निर्णय

Last Updated:

लवकरच अनेक अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर गुगलची काही अ‍ॅप्स काम करणं बंद करतील. गुगल काही फोन्सवर या अ‍ॅप्सचे अपडेट देणं सुद्धा बंद करेल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 29 नोव्हेंबर : विशिष्ट अँड्रॉइड स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. या युजर्सना गुगल क्रोम व कॅलेंडर ही दोन्ही अ‍ॅप वापरता येणार नाहीत. यामागचं कारणही आता उघड झालं आहे. कोणत्या स्मार्टफोनमध्ये ही अ‍ॅप्स वापरता येणार नाहीत व ती अ‍ॅप वापरायची असतील तर काय करावं लागेल. लवकरच अनेक अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर गुगलची काही अ‍ॅप्स काम करणं बंद करतील. गुगल काही फोन्सवर या अ‍ॅप्सचे अपडेट देणं सुद्धा बंद करेल.
(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
advertisement

कोणत्या अ‍ॅप्सचे अपडेट्स नाही मिळणार?

कंपनीने सांगितलंय की, जुन्या अँड्रॉइड फोन्सवर गुगल क्रोम आणि गुगल कॅलेंडर अ‍ॅप्सचं कोणतंही अपडेट या पुढे मिळणार नाही. कंपनी या अ‍ॅप्सना वेळोवेळी अपडेट करत असते आणि युजर्सनाही त्याचे अपडेट्स देत असते.

या अ‍ॅप्सची अपडेट्स मिळविण्यासाठी काय करावं लागेल?

जर तुम्ही एखादा जुना स्मार्टफोन वापरत आहात आणि तुम्हाला गुगलच्या या अ‍ॅप्सचं लेटेस्ट व्हर्जन वापरायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमचा फोन अपडेट करावा लागेल. 9 to 5 Google च्या रिपोर्ट्सनुसार, अँड्रॉइड 7.1 (Nougat) किंवा त्यापेक्षा जुन्या व्हर्जनवर काम करणाऱ्या फोन्समध्ये Chrome 120 चा सपोर्ट मिळणार नाही. सपोर्ट पेजवर दिलेल्या माहितीनुसार Chrome 120 अँड्रॉइड Nougat किंवा त्यापेक्षा जुनं व्हर्जन असलेल्या फोनमध्ये ही अ‍ॅप्स डाउनलोड होणार नाहीत आणि कामही करणार नाहीत.

advertisement

मेसेजचा अर्थ काय?

या मेसेजमध्ये युजर्सना नवीन अँड्रॉइड व्हर्जनवर फोन अपग्रेड करण्यास सांगितलं जाईल. याचा अर्थ असा की जर तुमचा फोन Android Oreo किंवा त्याच्या पुढच्या व्हर्जनवर काम करत नसेल तर तुम्हाला कोणतेच अपडेट मिळणार नाहीत.

याचा किती युजर्सवर होणार परिणाम?

गुगलच्या या निर्णयामुळे जवळपास आठ टक्के अँड्रॉइड युजर्सवर परिणाम होण्याची शक्यता आहे. गुगल क्रोम युज करण्यासाठी युजर्सकडे फोनचं किमान अँड्रॉइड 8 व्हर्जन असणं आवश्यक आहे.

advertisement

कॅलेंडरदेखील करणार नाही काम

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आता पेरणीचं काम होणार सोपे, सोलापुरातील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र, किंमत किती? Video
सर्व पहा

TheSpAndroid च्या रिपोर्टनुसार, गुगल कॅलेंडरबद्दलही अशीच तयारी कंपनी करत आहे. हे अ‍ॅपदेखील अँड्रॉइड 7.1 युजर्सना एक मेसेज दाखवत आहे. या मेसेजमध्ये युजर्सना लेटेस्ट गुगल ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट करण्याचा सल्ला दिला जात आहे. रिपोर्ट्सनुसार, लवकरच हे युजर्स गुगल क्रोम व गुगल कॅलेंडर ही दोन्ही अ‍ॅप युज करू शकणार नाहीत.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
google : तुमच्याकडे 'हा' फोन असेल तर बसेल फटका, गुगलने 'त्या' Apps बद्दल घेतला मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल