TRENDING:

Jio, Airtel सह Vi यूझर्सला मोठा दिलासा! 20 रुपयांत 4 महिने अ‍ॅक्टिव्ह राहील सिम

Last Updated:

TRAI New SIM Rule: देशात स्मार्टफोनची मागणी झपाट्याने वाढली आहे. अशा परिस्थितीत बहुतेक लोक एकापेक्षा जास्त सिमकार्ड ठेवतात. पण जुलै 2024 नंतर दोन्ही सिम रिचार्ज करणे महाग झाले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
TRAI New SIM Rule: देशात स्मार्टफोनची मागणी झपाट्याने वाढली आहे. अशा परिस्थितीत बहुतेक लोक एकापेक्षा जास्त सिमकार्ड ठेवतात. पण जुलै 2024 नंतर दोन्ही सिम रिचार्ज करणे महाग झाले आहे. हे लक्षात घेऊन आता TRAI ने एक नवीन नियम आणला आहे ज्यामुळे Jio, Airtel आणि Vi यूझर्सना मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन नियमाबद्दल सविस्तर माहिती घेऊ.
जिओ, एअरटेल की व्हीआय
जिओ, एअरटेल की व्हीआय
advertisement

महागड्या रिचार्जपासून सुटका

पूर्वी सेकेंडरी सिम वापरण्यासाठी रिचार्ज करावे लागायचे. तसेच नंबर बंद होण्याच्या भीतीने लोक दुसऱ्या सिममध्ये रिचार्ज करायचे. पण आता TRAI (Telecom Regulatory Authority of India) रिलायन्स जिओ, Airtel, Vi आणि BSNL च्या यूझर्सना नवीन नियमांनुसार दिलासा मिळणार आहे.

WhatsApp Status मध्ये टाकता येणार कोणतंही गाणं, आलंय हे नवं फीचर

advertisement

काय आहे ट्रायचा नवा नियम?

ट्रायच्या कन्झ्युमर हँडबुकनुसार, रिचार्ज पूर्ण झाल्यानंतर तुमचे सिम 90 दिवसांपर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहते. म्हणजे रिचार्ज संपल्यानंतरही तुमचा नंबर तीन महिने ॲक्टिव्ह राहील.

20 रुपयांची 120 दिवसांची व्हॅलिडिटी

ट्रायच्या म्हणण्यानुसार, तुमच्या नंबरवर 90 दिवसांपर्यंत रिचार्ज नसेल आणि त्यात 20 रुपये प्रीपेड शिल्लक असतील, तर कंपनी ते 20 रुपये कापून 30 दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडिटी देईल. अशा प्रकारे तुमचा नंबर एकूण 120 दिवस अ‍ॅक्टिव्ह राहू शकतो.

advertisement

Instagram चं क्रिएटर्सना गिफ्ट! आता अपलोड करु शकाल 3 मिनिटांचे Reels

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

एवढेच नाही तर 120 दिवस पूर्ण झाल्यानंतरही ट्राय तुम्हाला तुमचे सिम रिॲक्टिव्हेट करण्यासाठी 15 दिवसांचा वेळ देते. या 15 दिवसांतही सिम अ‍ॅक्टिव्ह न केल्यास, तो नंबर कायमचा लॉक केला जाईल आणि तो दुसऱ्या व्यक्तीला दिला जाईल. या नियमामुळे, दुय्यम सिम यूझर्सना महागड्या रिचार्जपासून दिलासा मिळणार आहे आणि गरजेनुसार नंबर अ‍ॅक्टिव्ह ठेवणे सोपे होईल.

advertisement

मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Jio, Airtel सह Vi यूझर्सला मोठा दिलासा! 20 रुपयांत 4 महिने अ‍ॅक्टिव्ह राहील सिम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल