WhatsApp Status मध्ये टाकता येणार कोणतंही गाणं, आलंय हे नवं फीचर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
WhatsApp Status Music: इंस्टाग्राम प्रमाणेच तुम्हाला व्हॉट्सॲप स्टेटसवर म्युझिक ॲड करण्याचे फीचर देखील मिळत आहे. आता तुम्ही तुमच्या फोटोवर कोणतेही गाणे पोस्ट करू शकता. तुम्हाला गाण्यांची संपूर्ण लायब्ररी येथे मिळेल. हे फीचर कसे काम करेल याचे पूर्ण डिटेल्स जाणून घ्या.
मुंबई : इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲप आपल्या यूझर्सच्या सोयीसाठी रोज नवनवीन फीचर्स आणत आहे. WhatsApp नवनवीन गोष्टींवर काम करत राहते. मेसेजिंग ॲप प्रत्येक वेळी यूझर्सचा अनुभव सुधारण्याच्या प्रयत्नात सतत नवीन फीचरची चाचणी घेत आहे. अशाच एका फिचरची चाचणी त्याच्या बीटा व्हर्जनमध्ये सुरू आहे. ज्यामध्ये यूजर्स इन्स्टाग्राम स्टेटस प्रमाणे व्हॉट्सॲप स्टेटसवर गाणी जोडू शकतात. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपने इन्स्टाग्रामसारख्या स्टेटसमध्ये उल्लेख करण्याचे फीचर ॲड केले होते. आता इन्स्टाग्रामप्रमाणे तुम्ही तुमच्या स्टोरीवर गाणेही टाकू शकाल.
सध्या, Android 2.25.2.5 साठी WhatsApp बीटावर या फीचरची टेस्टिंग केली जात आहे. हे फीचर फक्त काही निवडक बीटा यूझर्ससाठी उपलब्ध आहे.
whatsapp वर गाणे अॅड करा
WABetainfo नुसार, हे फीचर सध्या त्याच्या टेस्टिंग फेजमध्ये आहे. बीटा यूझर्सते ते वापरत आहेत. स्टेटस वर जाऊन ड्रॉईंग एडिटरमध्ये तुम्हाला नवीन ऑप्शन मिळेल. तुम्ही Meta च्या म्यूझिक कॅटलॉगमधून गाणी ब्राउझ करू शकाल. हे इन्स्टाग्राम फीचर जसे काम करते त्याच पद्धतीने काम करेल. इन्स्टाग्रामच्या म्युझिक लायब्ररीप्रमाणे, तुम्ही व्हॉट्सॲपच्या म्युझिक कॅटलॉग ऑप्शनमध्ये कोणतेही गाणे निवडू शकता. यामध्ये तुम्हाला स्वतंत्र ट्रेडिंग ट्रॅक आणि आर्टिस्ट सेक्शन वेगवेगळे मिळतील. ज्यातून तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर्च करू शकाल.
advertisement
whatsapp स्टेट्स मेंशन
व्हॉट्सॲप स्टेटसवर मेंशन फीचर वापरण्यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही. तुमच्या WhatsApp स्टेटसवर खाली दाखवलेल्या @ चिन्हावर फक्त क्लिक करा. टेक्स्ट बॉक्समध्ये @ वर क्लिक करा. कॉन्टॅक्टची संपूर्ण लिस्ट उघडेल. आता तुम्ही तुमच्या स्टेटसवर तुम्हाला हवं त्याला मेंशन करू शकता. मेंशन केलेला कॉन्टॅक्ट प्रत्येकाला शो होत नाही. तुम्ही सर्च बारमध्ये नाव टाइप करून देखील ते शोधू शकता. मेंशन केलेला कॉन्टॅक्ट प्रत्येकाला शो होत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 20, 2025 12:12 PM IST









