युझर्सच्या सोयीसाठी व्हॉट्सअॅपमध्ये 'ब्रॉडकास्ट लिस्ट' हे फीचर उपलब्ध आहे. या फीचरमुळे ग्रुप न बनवताही एकाच वेळी 256 जणांना मेसेज पाठवता येतो. नवीन ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करण्यासाठी, अॅप उघडा आणि उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर टॅप करा. तिथे तुम्हाला न्यू ब्रॉडकास्ट फीचर दिसेल. या फीचरवर क्लिक करा. न्यू ब्रॉडकास्टवर टॅप केल्यानंतर तुमच्या हवे असलेले कॉन्टॅक्ट्स सिलेक्ट करावे लागतील.
advertisement
या लिस्टमध्ये जास्तीत जास्त 256 कॉन्टॅक्ट्सचा समावेश करता येतो. पाहिजे त्या व्यक्तींची ब्रॉडकास्ट लिस्ट तयार केल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिला नाव देऊ शकता. ब्रॉडकास्ट लिस्ट तयार केल्यानंतर, तुम्ही पाठवू इच्छित असलेला मेसेज टाइप करून पाठवा. ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करणं आणि वापरणं खूप सोपं आहे. या फीचरच्या वापरामुळे वेळेचीदेखील बचत होते.
व्हॉट्सअॅप आपल्या युझर्सच्या सोयीसाठी वेळोवेळी अनेक नवीन फीचर्स सादर करत असतं. गेल्या काही महिन्यांत व्हॉट्सअॅपची अनेक नवीन फीचर्स रोल आउट करण्यात आली आहेत. युझर्सची प्रायव्हसी जपण्यासाठी कंपनी अजूनही अनेक नवीन फीचर्सवर काम करत आहे.
काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपने अनोळखी व्यक्तींच्या मेसेजेसनी त्रस्त असलेल्या युझर्ससाठी एक नवीन फीचर आणलं आहे. या फीचरमुळे तुम्ही फोनमध्ये व्हॉट्सअॅप न उघडताही अनोळखी क्रमांक ब्लॉक करू शकता. अनेक युझर्सना व्हॉट्सअॅपवर सतत अनोळखी व्यक्तींकडून मेसेज येत असल्याचं दिसून आलं आहे. अनेकदा अशा अनोळखी क्रमांकावरून फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जातो. व्हॉट्सअॅपवरच्या स्पॅम मेसेजेसपासून सुटका मिळवण्यासाठी संबंधित क्रमांक ब्लॉक करणं, हा सर्वांत प्रभावी उपाय आहे.