WhatsApp नवीन फीचर्सवर काम करत आहे
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp स्टेटस अपडेट्समध्ये ग्रुप चॅट्सचा उल्लेख करण्याच्या फीचरवर काम करत आहे. हे फीचर अँड्रॉइड बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. या फीचरसह, यूझर्स त्यांच्या स्टेटस अपडेटमध्ये विशिष्ट कॉन्टॅक्ट्सला डायरेक्टली नोटिफाय करु शकतील. यामुळे त्यांना टार्गेटेड ऑडियन्ससोबत एंगेज करणे सोपे करेल. जेव्हा एखाद्या संपर्काचा उल्लेख केला जातो तेव्हा त्यांना त्यांच्या चॅटमध्ये एक नोटिफिकेशन आणि एक मेसेज प्राप्त होतो ज्यात त्यांना मेंशनविषयी माहिती मिळते.
advertisement
3 हजारांपर्यंत बेस्ट स्मार्टवॉच हवी आहे? जबरदस्त आहेत हे ऑप्शन
यापूर्वी ग्रुप चॅटच्या सदस्यांना सूचित करण्यात काही मर्यादा होत्या. यूझर्स स्टेटस अपडेटमध्ये फक्त पाच कॉन्टॅक्ट्सलाच मेंशन करु शकत होते. परंतु, नवीन फीचर यूझर्सना त्यांच्या स्टेटसमध्ये संपूर्ण ग्रुप चॅटला डायरेक्टली मेंशन करण्याची सुविधा देते.
आता SIM आणि Network शिवाय करु शकणार कॉलिंग, काय आहे D2D टेक्नोलॉजी?
यूझर्ससाठी सोय
ग्रुप चॅटला मेंशन करून यूझर्स सर्व सदस्यांना अनाउंसमेंट, इव्हेंट किंवा शेअर केलेल्या कंटेंटविषयी कळवू शकतात. यासाठी त्यांनी सर्वांना पर्सनली मेसेज देण्याची गरज भासणार नाही. यामुळे वेळेची बचत होते आणि सर्व ग्रुप मेंबर्सला एकाच वेळी कळेल.