वाढती लोकसंख्या आणि अपुऱ्या बससेवेमुळे परिवहन व्यवस्थेवर ताण वाढला आहे. भविष्यात 30 टक्के तिकीट दरवाढीची अपेक्षा टीएमटी प्रशासनाने व्यक्त केली. ठाणे महापालिका हद्दीत सुमारे 27 लाख लोकसंख्या आहे. नियमानुसार प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे किमान 30 बस आवश्यक आहेत. त्यामुळे शहरासाठी सुमारे 1350 बसेसची गरज आहे. प्रत्यक्षात केवळ 407 बसेसच रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांना अपुऱ्या सेवेला सामोरे जावे लागते. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात डबल डेकर बस सुरू करण्याचे आश्वासन यंदाही अर्थसंकल्पात पुन्हा दिले आहे. गेल्या वर्षीही अशी घोषणा करण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात एकही डबल डेकर बस रस्त्यावर उतरली नाही.
advertisement
ठाणे परिवहन सेवेची स्थिती डळमळीत आहे. सेवा सुरळीत चालवण्यासाठी परिवहन प्रशासनाने 538 कोटी 30 लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी ठाणे महापालिकेकडे केली होती. मात्र, महापालिकेने अर्थसंकल्पात केवळ 290 कोटी रुपयांची तरतूद केली.
