TRENDING:

Shocking: शेजाऱ्यांनी फक्त दरवाजा उघडला होता, पण समोर जे दिसलं त्याने फुटला घाम; नालासोपारा हादरलं

Last Updated:

Nalasopara Death Case : नालासोपाऱ्यातील महेश पार्क परिसरातील एका इमारतीत घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरुन गेलेला आहे. सध्या या घटनेचा पोलिस तपास सुरु आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नालासोपारा : नालासोपाऱ्यातील महेश पार्क परिसरातील एका इमारतीत मंगळवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. बंद घरात खोलीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
News18
News18
advertisement

बंद खोलीत 30 वर्षाच्या हिरेनचा शेवट

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपाऱ्यातील महेश पार्क या परिसरात हिरेन महेंद्र चित्तौडा हा व्यक्ती एकटाच राहतो. मात्र काही दिवसांपासून तो बाहेर दिसत नव्हता शिवाय त्याच्या असण्याचा कोणालाही काही पत्ता लागत नव्हता. या सर्व कारणामुळे शेजाऱ्यांना शंका येऊ लागली होती.

हिरेन बऱ्याच दिवसांपासून दिसत नव्हता त्यामुळे शेजाऱ्यांच्या मनात शंका होती त्यानंतर मंगळवारी त्याच्या घरातून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांचा संशय अधिकच वाढला. त्यामुळेच शेजारच्यांनी तातडीने हिरेनच्या बहिणीशी सर्व प्रकार कळवला शिवाय परिसरातील सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल बांदेकर यांनाही याबाबत सांगण्यात आले.

advertisement

घटनेची माहिती मिळताच तुळींज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्व उपस्थित झाल्यानंतर घराचा दरवाजा उघडण्यात आला आणि समोर भीषण दृश्य पाहायला मिळाले. हिरेनचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपासासाठी शवविच्छेदनासाठी पाठवला.

हत्या की आत्महत्येचा बनाव?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणाची जोड अन् जिद्दीची भरारी,माय-लेकाने सुरु केला व्यवसाय, कमाई तर पाहा
सर्व पहा

हिरेनचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आत्महत्या, अपघात की अन्य काही कारण आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे महेश पार्क परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत. तुळींज पोलीस अधिक तपास करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
Shocking: शेजाऱ्यांनी फक्त दरवाजा उघडला होता, पण समोर जे दिसलं त्याने फुटला घाम; नालासोपारा हादरलं
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल