TRENDING:

Badlapur Crime: घरात सोन्याचे खिळे ठोकावे लागणार, बाबाच्या खेळात फसले अन् 9 लाखांना लुटले

Last Updated:

Badlapur Crime: मुंबईमध्ये स्थायिक असलेले चंद्रकांत चिले बदलापूरात एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यांना चार भोंदूंनी त्यांच्या घरामध्ये पूर्वी घडलेल्या घटनांचा आधार घेत पुढेही अशाच काहीशा घटना घडतील, अशी भिती दाखवत त्यांना पूजा करायला सांगितलं आणि लाखोंचा गंडा घातला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बदलापूर: बदलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. चार भोंदू ज्योतिषींनी एका वृद्धाला तुमच्या घरावर पिशाच्च सोडलंय, असं सांगून लाखोंचा गंडा आणि लाखोंचं सोनं चोरी केलं आहे. बदलापूरमध्ये झालेल्या या चोरीच्या प्रकरणामुळे संपूर्ण बदलापूर पूर्व हादरलं आहे. मुंबईमध्ये स्थायिक असलेले चंद्रकांत चिले, हे वृद्ध व्यक्ती बदलापूरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी त्यांना चार भोंदू ज्योतिषींनी घेरलं. त्यांच्या घरामध्ये पूर्वी घडलेल्या घटनांचा आधार घेत पुढेही अशाच काहीशा घटना घडतील अशी भिती दाखवत त्यांना पूजा करायला सांगितलं आणि लाखोंचा गंडा घातला, नेमकं काय प्रकरण घडलंय, जाणून घेऊया...
Badlapur Crime: घरात सोन्याचे खिळे ठोकावे लागणार, बाबाच्या खेळात फसले अन् 9 लाखांना लुटले
Badlapur Crime: घरात सोन्याचे खिळे ठोकावे लागणार, बाबाच्या खेळात फसले अन् 9 लाखांना लुटले
advertisement

मुंबईमध्ये राहणारे चंद्रकांत चिले बदलापूरामध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांना 4 भोंदू ज्योतिषी बाबांनी गाठून त्यांना आपल्या जाळ्यात ओढलं. तुमच्या घरावर कोणीतरी पिशाच्च सोडलंय, असं बोलून त्यांच्याकडून तब्बल 9 लाख 72 हजार रूपये रोख रक्कम आणि सोनं घेऊन फरार झाले आहेत. चारही भोंदूंना त्या वृद्धाला आपल्या जाळ्यात खेचण्यासाठी फार काही वेळ लागला नाही, काही वेळातच ते त्यांच्या जाळ्यात अडकले. गेल्या काही महिन्यांपूर्वी तुमच्या घरी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता, आता आणखीन एका व्यक्तीचा मृत्यू होईल, अशी भिती त्यांना दाखवली. हे सर्व थांबवण्यासाठी कामख्या देवीला पूजा करावी लागेल.

advertisement

सोबतच तुमच्या घरात चार सोन्याचे खिळे ठोकावे लागतील, असं सांगून त्या भोंदू ज्योतिषांनी वृद्ध व्यक्तीकडून 9 लाख 72 हजार रूपयाची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेतले. असा सर्व लाखोंचा मुद्देमाल घेऊन चार ज्योतिष तिथून पळाले. वृद्ध व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचे कळाले नाही, घटनेच्या काही दिवसांनंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे कळाले. फसवणूक झाल्याचे कळताच चिले यांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. धाव घेत घडलेली सर्व घटना त्यांनी पोलिसांना सांगितली असून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवले आणि आरोपींना ताब्यात घेतले. घटनेची सखोल चौकशी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राकेश गज्जल यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळीचे दर घसरले, आल्याचे भाव तेजीत, डाळींबाची काय स्थिती?
सर्व पहा

बदलापूर पोलीसांकडून चारही भोंदू ज्योतिषांवर फसवणूक आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन कायदान्वये गुन्हा दाल करण्यात आला आहे. चिले यांची फसवणूक करणाऱ्या चार भोंदू ज्योतिषांची नावे देखील समोर आले आहेत. आरोपी ब्रह्मदत्त इंगळे, शिवलींग इंगळे, भवानी इंगळेसह अन्य एकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. बदलापूर पूर्व पोलीसांनी या चारही आरोपींना बदलापूरमध्येच बेड्या ठोकल्या आहेत.

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
Badlapur Crime: घरात सोन्याचे खिळे ठोकावे लागणार, बाबाच्या खेळात फसले अन् 9 लाखांना लुटले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल