सहा महिन्यांपूर्वीच नालासोपाऱ्यामध्ये कशिशवर एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता. ती तिच्या आजोबासोबत बाहेर जात असताना, ही घटना घडली होती. जेव्हा कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला, त्यावेळी तिच्या हातावर कुत्र्याने ओरखडलं. त्यामुळे तिच्या हातावर जखम झाली. लगेचच तिला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी तिच्या कुटुंबीयांनी नालासोपाऱ्यातील एका खासगी रूग्णालयात नेलं. पण ती इंजेक्शनला घाबरत असल्यामुळे तिला इंजेक्शन दिलं नाही. कुत्र्याने चावल्यानंतर किंवा ओरखडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणाऱ्या लसचा तिने संपूर्ण कोर्स पूर्णच केला नाही.
advertisement
त्यामुळे सर्वांनीच त्याकडे दुर्लक्ष केलं. जेव्हा तिला कुत्र्याने चावा घेतला, त्यावेळी तिची तब्येत खूपच अस्वस्थ होती. तिला इंजेक्शनची भिती वाटत असल्यामुळे तिला कोणीही इंजेक्शन देण्याची साधी जबरदस्ती सुद्धा केली नाही. कालांतराने तिच्या हातावर कुत्र्याने जिथे ओरखडलं होतं, ती जखम सुद्धा बरी झाली. काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा अचानक, कशिशची तब्येत बिघडली. तब्येत बिघडल्यामुळे तिने अचानक खाणंपिणं सुद्धा बंद केलं. त्यानंतर तिचे डोळे लालसर होऊ लागले. तिचे डोळे लाल झाले आहेत, हे स्पष्टपणे दिसत होते. डोळे लाल होणे, हे लक्षण रेबीज आजार वाढल्याची ठळक लक्षणे आहेत.
तिची गंभीर परिस्थिती पाहून तिच्या कुटुंबीयांनी तिला तातडीने परिसरातील एका रुग्णालयात दाखल केले. नंतर तिला विशेष उपचारांसाठी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी आणि त्यांच्या टीमने तिच्यावर उपचार सुद्धा केले. पण उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. कस्तुरबा रूग्णालयाने दिलेल्या अधिकृत मेडिकल रिपोर्टनुसार. कशिशच्या मृत्यूचे कारण रेबीजचा संसर्ग असल्याचे दिले. दरम्यान, महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांनी कशिशच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तिच्या कुटुंबीयांनी विरोधी पक्षनेते मनोज पाटील यांच्या मार्फत प्रशासनाला परिस्थितीची गंभीर दखल घेण्याचे आवाहन केले.
