TRENDING:

KDMC पुन्हा ॲक्शन मोडवर, 14 इमारती, 14 घरांवर हातोडा; आयुक्तांचे थेट आदेश

Last Updated:

कल्याण पूर्वेतील चिंचपाडा गावतही केडीएमसीने बेधडक कारवाई केली आहे. चिंचपाड्यातील पवार नगर परिसरात बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेने हातोडा चालवला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण: कल्याण- डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये, सध्या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई सुरू आहे. सर्वच प्रभागांमध्ये महानगरपालिकेकडून कारवाई करण्याचे सध्या सुरू आहे. अलीकडेच 27 गावांमध्ये बेकायदा इमारतींवर हातोडा चालवल्यानंतर आता अशातच कल्याण पूर्वेतील चिंचपाडा गावतही महानगरपालिकेने बेधडक कारवाई केली आहे. सोमवारी वॉर्ड 9/1 अंतर्गत चिंचपाड्यातील पवार नगर परिसरात बेकायदेशीर बांधकामांविरोधात कारवाई करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात बुलडोझरच्या सहाय्याने पालिकेच्या कोणत्याही परवानगीशिवाय बांधलेली सर्व अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली.
News18
News18
advertisement

चिंचपाडा गावातील पवार नगर परिसरामध्ये तात्पुरते छप्पर असलेल्या आणि विटांचं बांधकाम केलेल्या 14 इमारतींवर, पूर्णपणे बांधलेल्या 14 घरांवर आणि दोन बेकायदेशीरपणे बांधलेल्या चाळींवर महापालिकेने बेधडक कारवाई केलेली आहे. महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकामे आवश्यक परवानग्यांशिवाय आणि विकासाच्या नियमांचे उल्लंघन करून केल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सर्व उपआयुक्तांना शहरातील रिकामी बेकायदेशीर बांधकामे पाडण्यास प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत.

advertisement

सोबतच, कमी किंमतीमध्ये बांधलेल्या आणि गृहनिर्माण योजनांचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भूमाफियांवर महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन (एमआरटीपी) कायद्यांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, कमी किंमतीचे अमिष दाखवून घर खरेदीदारांना लक्ष्य करणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील अवैध बांधकाम रॅकेटमध्ये सामील असलेल्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यासारख्या (MCOCA) कठोर कायद्यांचा वापर करण्याचे संकेत सुद्धा यावेळी देण्यात आलेले आहेत. 

advertisement

उपायुक्त चंद्रकांत जगताप, अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधीक्षक राजेंद्र साळुंखे यांच्या देखरेखीत ही तोडक कारवाई राबविण्यात आली. या कारवाईत महापालिकेचे अधिकारी, सात कर्मचारी, आठ पोलीस कर्मचारी, दहा कंत्राटी मजूर आणि दोन जेसीबी मशीन यांचा सहभाग होता. कारवाईदरम्यान, काही स्थानिक रहिवाशांनी आणि बाधित इमारतींच्या मालकांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण, पोलीस बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली आणि कोणतीही अनुचित घटना न घडता मोहीम यशस्वीपणे पार पडली. 

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाच्या दरात मोठी उलथापालथ, केळी भाव घसरले, कांद्याची काय स्थिती?
सर्व पहा

अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सुरळीतपणे आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडल्याची माहिती केडीएमसीच्या उपायुक्तांनी दिली. महापालिकेच्या या कठोर भूमिकेमुळे परिसरातील बेकायदेशीर बांधकामांना आळा बसेल अशी अपेक्षा सुद्धा उपायुक्तांनी व्यक्त केली आहे. 

मराठी बातम्या/ठाणे/
KDMC पुन्हा ॲक्शन मोडवर, 14 इमारती, 14 घरांवर हातोडा; आयुक्तांचे थेट आदेश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल