लांब पल्ल्याचा प्रवास आता आपल्या शहरातून
वसई-विरारकरांना आता बाहेरगावी प्रवास करण्यासाठी त्यांच्या शहरातून लांब पल्ल्यांच्या गाड्या पकडता येणार आहे. कारण वसई रोड रेल्वे स्थानकात अतिशय भव्य असे कोचिंग टर्मिनस उभ्यारण्यात येणार असून 2026 मे पासून या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
आधी वसईतून हजारोच्या संख्येने प्रवासी बाहेरगावी जात असतात मात्र लोकलच्या गर्दीतून त्यांना वांद्रे किंवा, दादर, कुर्ला, सीएसएमची रेल्वे स्थानकात यावे लागत होते. त्यामुळे या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून यावर वसई रोड रेल्वे स्थानकात टर्मिनस व्हावे अशी मागली गेल्या काही वर्षांपासून नागरिकांची होती. या मागणीचा विचार करुन प्रशासनाकडूनही प्रयत्न सुरु होते मात्र अनेक अडचणी येत असल्याने हे काम मार्गी लागत नव्हते.
advertisement
कधी पर्यंत होणार काम पूर्ण?
अखेर पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये पुन्हा एकदा या गोष्टींचा पाठपुरावा केंद्रात केला आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही मागणी मान्य झाल्याची घोषणाही केली होती. त्यानंतर 2026 पासून या टर्मिनसच्या कामाला प्रत्यक्श सुरुवात होणार असल्याती माहिती रेल्वे प्रशासनाने पत्राद्वारे दिली आहे. हे काम या वर्षीसुरु होऊन 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन ही करण्यात आलेले आहे.
