TRENDING:

Thane News: ठाण्यातील वडपे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Last Updated:

ठाणे- वडपे परिसरातील नाशिक-मुंबई महामार्गावर गेल्या काही तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: नाशिक- मुंबई महामार्गावरून एक महत्त्वाची बातमी येत आहे. गेल्या तीन तासांपासून नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे. त्यामुळे नाशिकहून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. ऐन संध्याकाळच्या वेळीच वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे वाहतूक कोंडी झाली आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही. घटनास्थळी वाहतूक पोलीस पोहोचले असून त्यांच्याकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे.
News18
News18
advertisement

ठाण्यातील वडपे परिसरामध्ये ही वाहतूक कोंडी झाली असून मुंबईकडे, नाशिक- कल्याणकडे आणि आत ठाण्यामध्ये जाणारे सर्वच रस्ते गेल्या काही वेळेपासून ठप्प झाले आहेत. 10 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहतूक दारांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. नेमकं वाहतूक कोंडीचं कारण अद्याप अस्पष्ट असून वाहने पुढे सुद्धा आणि मागे सुद्धा जात नाही. त्यामुळे सर्वांचीच ऐन संध्याकाळच्या वेळी तारांबळ उडाली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाच्या दरात मोठी उलथापालथ, केळी भाव घसरले, कांद्याची काय स्थिती?
सर्व पहा

मुंबई-नाशिक महामार्गावरील ठाणे ते वडापे दरम्यानच्या रस्ता रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. त्याचे सध्या काम सुरू आहे. माजिवाडा आणि वडापे दरम्यानच्या 28.80 किमी लांबीच्या रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर पूर्ण झालेले आहे. कंत्राटदाराकडून कामाला गती मिळाली असून प्रकल्पाचे काम येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या कामामुळे वाहतूकदारांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. जून 2021 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचा उद्देश महामार्गाचा चार लेनवरून आठ लेनपर्यंत विस्तार करणे आणि या मार्गावरील तीव्र वाहतूक कोंडीची समस्या सोडवणे हा आहे.

advertisement

मराठी बातम्या/ठाणे/
Thane News: ठाण्यातील वडपे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल