TRENDING:

ST Bus : होळीसाठी गावी जायचंय? वसई, अर्नाळा आणि नालासोपाऱ्यातून कोकणात जाणार स्पेशल बस; एसटीचं वेळापत्रक

Last Updated:

St Buses For Shimga Festival : कोकणकरांनो आता शिमग्यासाठी पालघर जिल्हातून जाणार आहात आणि अजूनही ट्रेनचे तिकीट काढले नसाल तर तांबा. कारण आता या 3 ठिकाणावरुन एसटी महामंडळाच्या बसेस जाणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
ठाणे : पालघर जिल्ह्यातील नागरिकांना शिमगोत्सवासाठी कोकणात जाता यावे यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. विशेष बसगाड्यांच्या आगाऊ आरक्षणाला सुरुवात झाली असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र या बसेस नेमक्या कुठून सुटणार आहेत ते प्रवाशांना जाऊन घेणे महत्त्वाचे आहे.
Palghar division ST special buses for Shimga festival
Palghar division ST special buses for Shimga festival
advertisement

कोकणवासीयांसाठी एसटीचे 'होळी गिफ्ट'

कोकणात शिमगोत्सवाला खुप महत्त्व आहे. ज्यामध्ये देवाच्या पालख्या, ग्रामदैवतांची पूजा आणि पारंपरिक कार्यक्रमांसाठी मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरातील कोकणवासीय मोठ्या संख्येने गावी जातात. ही गर्दी लक्षात घेऊन एसटीने दरवर्षीप्रमाणे यंदाही विशेष बसेसची सोय केली आहे.

पालघर विभागातील वसई, अर्नाळा आणि नालासोपारा या तीन आगारांतून आतापर्यंत 32 बस आरक्षित झाल्या आहेत. ज्यात 28 फेब्रुवारी रोजी सर्वाधिक गर्दी अपेक्षित आहे. त्या दिवशी वसई आणि अर्नाळा येथून प्रत्येकी 2 तर नालासोपाऱ्यातून 23 अशा एकूण 27 बस कोकणात जाणार आहेत शिवाय 1 मार्च रोजी वसई आणि नालासोपारा येथून प्रत्येकी 2 बस सुटणार आहेत तसेच 5 मार्च रोजी नालासोपाऱ्यातून आणखी एक बस आरक्षित करण्यात आली आहे.

advertisement

परतीच्या बसेससाठीही आरक्षण सुरू

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रमजानमध्ये दिली जाते जकात, काय आहे या मागील प्रथा आणि महत्त्व? Video
सर्व पहा

फक्त जाण्यासाठीच नव्हे तर होळी संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठीही आगाऊ नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत 6 बस आरक्षित झाल्या आहेत. 3 आणि 4 मार्च रोजी नालासोपाऱ्यातून प्रत्येकी एक बस सुटेल. 5 मार्च रोजी नालासोपारा आणि अर्नाळा येथून प्रत्येकी एक बस परतीसाठी धावणार आहे.

मराठी बातम्या/ठाणे/
ST Bus : होळीसाठी गावी जायचंय? वसई, अर्नाळा आणि नालासोपाऱ्यातून कोकणात जाणार स्पेशल बस; एसटीचं वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल