घटने दिवशी नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसा, चोरांनी शायना यांच्या घराचे कुलूप तोडून आत शिरले. घरातील सोन्याचे आणि चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि काही मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या. यामुळे शायना यांना केवळ आर्थिकच नाही तर मानसिक फटका देखील बसला आहे.
शायना खान यांनी या घटनेची तक्रार डायघर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. तक्रारीत त्यांनी सांगितले की घरामध्ये कोणतेही लोक नव्हते, म्हणून चोरांनी हीच संधी साधून सहज प्रवेश मिळाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून प्राथमिक तपास सुरू केला असून साक्षीदारांची चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम चालू असून या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
advertisement
मुंबईतील घरफोडीच्या या प्रकारामुळे पोलिसांनी लोकांना सतर्क राहण्याचे, घराचे कुलूप आणि सुरक्षा यंत्रणा अधिक बळकट करण्याचे सांगितले आहे तसेच पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी करून चोरांना शोधण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे.
