TRENDING:

Thane News: मुंबईनंतर ठाण्यातही धावणार डबलडेकर बस, आणखी किती दिवसांची प्रतिक्षा?

Last Updated:

मुंबईनंतर आता ठाण्यातही डबलडेकर एसी बस धावणार आहे. त्याची तरतूद 2026- 27च्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. लवकरच डबलडेकर बस प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे: बीएमसीनंतर आता टीएमसीने सुद्धा शहरामध्ये डबलडेकर बस सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे. अलीकडेच ठाणे महानगरपालिकेचा बजेट सादर करण्यात आला. 2026- 27 वर्षाच्या सादर केलेल्या बजेटमध्ये येत्या सहा महिन्यांमध्ये या डबलडेकर एसी बसेस ठाणे महानगरपालिकेच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची घोषणा केली आहे. पहिल्यांदाच ठाण्यामध्ये डबलडेकर बस धावणार आहे. मुंबई महानगर पालिकेच्या धर्तीवर आता ठाणे महानगर पालिका क्षेत्रात आता बस धावणार आहे.
News18
News18
advertisement

ठाणे महापालिकेमध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये ठाणे परिवहन उपक्रमाकडून डबलडेकर एसी बसची घोषणा केली आहे. त्यामुळे आता ठाणेकरांनाही मुंबईकरांप्रमाणेच डबलडेकर बसची सुविधा उपलब्ध होणार आहे. शहरातील कोणकोणत्या मार्गांवर या डबलडेकर बसेस चालवल्या जाणार, हे जरीही अद्याप अस्पष्ट असले तरी, घोडबंदर ते ठाणे पुर्व स्थानक या मार्गावर या बसगाड्या चालविण्यात येणार असल्याचे समजते. 2026- 27 या आर्थिक वर्षासाठी 791.86 कोटी रुपयांचं बजेट ठाणे महानगरपालिका परिवहन (टीएमटी) मॅनेजर भालचंद्र बेहेरे यांनी सादर केले.

advertisement

डबल- डेकर बसची सेवा पुढच्या सहा महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. प्रवाशांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, बजेटमध्ये एसी बसेसच्या दराबद्दल माहिती नाही. सोबतच दरवाढ सुद्धा केलेली नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेच्या (CIRT) मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करण्यासाठी, बस उपलब्धतेमधील सध्याची तफावत भरून काढण्याचे महानगर पालिकेच्या परिवहन विभागाचे उद्दिष्ट आहे. शहरात सध्या केवळ 407 ते 467 बसेस कार्यरत आहेत, तर 27 लाख लोकसंख्येसाठी अंदाजे 1350 बसची आवश्यकता आहे. त्या प्रमाणे महानगर पालिकेच्या परिवहन विभागाकडून बस सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत.

advertisement

महानगरपालिकेने घोषणा केलेल्या नव्या 370 नवीन बसेस दाखल करण्याची योजना आखली आहे, ज्यामध्ये Pm E- Bus सेवा योजनेअंतर्गत 100 एसी इलेक्ट्रिक बसेस, 15 व्या वित्त आयोगामार्फत 160 एसी इलेक्ट्रिक बसेस आणि 110 सीएनजी बसेसचा समावेश महानगरपालिकेच्या ताफ्यामध्ये होणार आहे. खरंतर, टीएमटीला गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक फटका बसला आहे, त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांच्या सेवेमध्ये बसेसला कायम ठेवण्यासाठी परिवहन विभागाकडून 538.30 कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी केली होती. परंतु प्रशासनाने केवळ 290 कोटी रुपयेच दिले आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार, थकलेला पगार किंवा इतर भत्ते मिळण्यासाठी उशीर होऊ शकतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षाच्या दरात मोठी उलथापालथ, केळी भाव घसरले, कांद्याची काय स्थिती?
सर्व पहा

सध्या, दररोज 3 लाखांहून अधिक प्रवासी टीएमटी सेवांवर अवलंबून आहेत. वाढत्या लोकसंख्या लक्षात घेता, त्याप्रमाणेच बसेसची मागणी केली जात आहे.

मराठी बातम्या/ठाणे/
Thane News: मुंबईनंतर ठाण्यातही धावणार डबलडेकर बस, आणखी किती दिवसांची प्रतिक्षा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल