TRENDING:

Vasai News : आईची नजर चुकली अन् अनर्थ घडला! खेळता खेळता बादलीत पडली; 2 वर्षाच्या इशिकाचा मृत्यू

Last Updated:

Vasai Shocking Accident : वसई पूर्व भागात घरात खेळताना दोन वर्षांच्या चिमुकलीसोबत दुर्देवी घटना घडते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून पालकांनी लहान मुलांच्या सुरक्षेबाबत अधिक काळजी घेण्याची गरज पुन्हा समोर आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वसई : वसई शहरातील खैरपाडा परिसरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडलेली आहे. आनंदाने घरात हसत खेळणाऱ्या अवघ्या दोन वर्षांत्या चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
खेळता खेळता बाल्टीत पडून दोन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
खेळता खेळता बाल्टीत पडून दोन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
advertisement

एका क्षणाची चूक अन् होत्याचे नव्हते झाले

मिळालेल्या माहितीनुसार, वसई पूर्व भागातील एका सोसायटीत राहणारी गोंडस इशिका सोमवारीही संध्याकाळी आपल्या घरात खेळत होती. अचानक खेळता-खेळता घरातच असलेल्या पाण्याच्या बाल्टीजवळ गेली आणि त्याच वेळी कोणाच्याही लक्षात न येता ती त्या बाल्टीत पडली गेली.

घरातल्यांना संपूर्ण घटना लक्षात येईपर्यंत उशीर झालेला होता. चिमुकलीच्या घरच्यांनी तिला तातडीने वसई येथील एका खासजी रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी तपासल्यानंतर चिमुकलीला मृत घोषित केले. घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
भारतीय स्वातंत्र्यासाठी इथं व्हायच्या बैठका, पुण्यातील ऐतिहासिक राम मंदिर, तुम्ही पाहिलंय का? Video
सर्व पहा

वसईत घडलेल्या या घटनेमुळे घरातील चिमुकल्यांची किती काळजी घेणे महत्त्वाते आहे ते समोर आले असून या घटनेप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.

मराठी बातम्या/ठाणे/
Vasai News : आईची नजर चुकली अन् अनर्थ घडला! खेळता खेळता बादलीत पडली; 2 वर्षाच्या इशिकाचा मृत्यू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल