ठाकरेंच्या पक्षाचे नाशिक शहरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाशी संबंध असल्याचा आरोप आमदार नितेश राणेंनी केलाय. या प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिलेत तर बडगुजर यांनी आरोप फेटाळून लावलेत. नितेश राणेंच्या आरोपांमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगलाय.