TRENDING:

व्हिडिओ

Video: मालेगावच्या शेतकऱ्याची मुलगी झाली IAS, प्रेरणा खवळेची यशाला गवसणी

Last Updated: Mar 09, 2026, 21:45 IST

संघ लोकसेवा आयोगाचा निकाल लागला. त्यात मालेगावच्या छोट्या गावातील 4 मुलींनी या संघ लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमध्ये उत्तुंग असं यश मिळवलं आहे. तेथील शेतकरी कैलास खवळे यांची कन्या प्रेरणा खवळे हिने मोठ्या यशाला गवसणी घातली आहे.

Advertisement

Special Report: उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार? पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची सावध भूमिका?

Last Updated: Mar 09, 2026, 21:03 IST

महाविकास आघाडीनं विधान सभेवर कोण जाणार? यावर कसाबसा तोडगा काढला. पण आता त्यांच्यासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.पेच आहे की विधानपरिषदेवर कुणाला पाठवायचं? कारण ठाकरेंनी सगळ्यात आधी आपल्या हुकुमाचा एक्का टाकलाय. त्यामुळे दोन्ही मित्र पक्ष गपगार आहेत.

Video: नवऱ्यानेच दिली सुपारी... बुलढाण्यात शिक्षिकेची 'क्राइम पेट्रोल'पेक्षा डें

Last Updated: Mar 09, 2026, 20:48 IST

Buldhana Crime News | बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे शिक्षिका वृषाली गावंडे यांच्या मृत्यूचा धक्कादायक उलगडा झाला आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे पतीनेच सुपारी देऊन खून केल्याचे तपासात समोर आले. पोलिसांनी या प्रकरणी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

Advertisement

Video: मुंबईत बाईक टॅक्सीवर कडक कारवाई, रॅपिडो-ओला-उबरला दणका

Last Updated: Mar 09, 2026, 20:22 IST

पेट्रोलवर चालणाऱ्या बाइक टॅक्सी संपूर्णपणे बेकायदेशीर असून परिवहन विभाग अश्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करत आहे, असे सांगताना पेट्रोलवर चालणाऱ्या ओला-उबर-रॅपिडो बाइक टॅक्सीवर बंदी आणल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

Video: बच्चू कडूंनी आंदोलन केले म्हणून आम्ही कर्जमाफी केली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठं वक्तव्य

Last Updated: Mar 09, 2026, 19:57 IST

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांच्याशी फोनद्वारे संपर्क केला आहे. बच्चू कडूंनी आंदोलन केले म्हणून आम्ही कर्जमाफी केली. याचं श्रेय सर्व बच्चू कडूंना जातं असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. सिडकोचं काम माझ्याकडे आहे ते लवकरच पुर्ण करतो असेही त्यांनी आश्वासन दिले आहे.

Advertisement

Sanju Samson: बेंचवर बसवलं पण खचला नाही, संधी मिळताच तुटून पडला, संजू सॅमसन वर्ल

Last Updated: Mar 09, 2026, 19:49 IST

Sanju Samson News | Sanju's come back | न्युझीलंड दौऱ्यानंतर हताश झालेल्या Sanju Samson ला काल प्लेयर ऑफ द tournament घोषित करण्यात आलं. 199.37 स्ट्राईक रेट आणि रन रेट 80.25 होता. शेवटच्या 5 मॅचमध्ये त्याने 321 रन काढले.

Video: फक्त महिलांना सक्षम करण्याचा नाही, तर अर्थचक्र परिवर्तित करण्याचा हा कार्यक्रम - मुख्यमंत्री फडणवीस

Last Updated: Mar 09, 2026, 18:18 IST

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला दिनाच्या कार्यक्रमाला भाषण करताना म्हटले, प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम हा महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम आहे. महिलांना मानव संसाधन म्हणून अर्थव्यवस्थेच्या या चक्रामध्ये भागिदारी मिळाली पाहिजे. या दृष्टीने या योजना केल्या आहेत. योजनेतून आधार देण्याचं काम करत आहोत.वेगवेगळ्या प्रयोगातून महिलांना सक्षम करायचा विचार चालला आहे. 1 कोटी माझ्या भगिनी लखपती दीदी बणणार आहेत. त्या आता अर्थव्यवस्थेच्या भाग बनणार आहेत. फक्त महिलांना सक्षम करण्याचा नाही, तर अर्थचक्र परिवर्तित करण्याचा हा कार्यक्रम आहे.

Advertisement

Video: ग्राऊंडवर आली, मिठी मारली अन् थेट KISS घेतली; हार्दिक-मिहिकानंतर क्रिकेट

Viral
Last Updated: Mar 09, 2026, 18:14 IST

Ishan Kishan Girlfriend | वर्ल्ड कप फायनलनंतर भारतीय संघाच्या सेलिब्रेशनदरम्यान इशान किशनचा एक खास क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सेलिब्रेशनदरम्यान इशानने स्टँड्समध्ये असलेल्या अदिती हुंडियाला मिठी मारली आणि त्या क्षणाचा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान चर्चेत आला. अदिती हुंडिया ही पेशाने मॉडेल असून ती २०१७ साली मिस इंडिया फायनलिस्ट होती. २०१८ मध्ये तिने ‘मिस दिवा सुपरनॅशनल’चा किताब जिंकला होता आणि २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले होते. जयपूरची असलेली अदिती सध्या स्वतःचे फॅशन आणि मेकअप लेबल चालवते. इशान आणि अदिती गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना या व्हायरल व्हिडिओमुळे पुन्हा उधाण आले आहे.

Viral Video: महाबळेश्वरमध्ये 2 गव्यांची झूंज! कधीही पाहिलं नसेल असं थरारक दृष्य कॅमेऱ्यात कैद!

Viral
Last Updated: Mar 09, 2026, 17:44 IST

पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरला निसर्गाच सौंदर्य लाभल आहे. येथील घनदाट झाडांमुळे महाबळेश्वर परिसरात वन्य प्राण्यांचा वावर प्रचंड प्रमाणामध्ये असतो. अगदी महाबळेश्वरच्या बाजारपेठेमधून गव्यांचा फेरफटका वारंवार पाहायला मिळतो. महाबळेश्वर परिसरामध्ये दोन गव्यांची झुंज पाहायला मिळाली. दरम्यान हा थरारक प्रसंग कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून याचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

Advertisement

Video: सांगलीच्या डाळींबाची निर्यात थांबली, दरात मोठी घसरण, शेतकरी हवालदिल

Last Updated: Mar 09, 2026, 17:05 IST

आखाती देशांमध्ये युद्ध भडकले आहे. त्यामुळे त्याचा फटका हा भारतीय शेतकऱ्यांना बसला आहे. सांगलीतील डाळींब हे निर्यातीसाठी पुर्णपणे बंद झाली आहे. जेएनपीटी बंदरावर १५० ते २०० कंटेनर्स हे निर्यातीच्या प्रतिक्षेत थांबलेले आहेत. सांगलीसह नाशिक, सोलापूर मधील निर्यातीसाठी असलेले डाळींब हे स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी परत आलेले आहेत. तसेच ३०० रुपये प्रतिकिलो असणारा दर आता १५० रुपयावर येऊन थांबलेला आहे.

Video: 'शेतकऱ्याचा पोरगा IPS झाला' संगमनेरच्या धनंजयचा वर्दीपर्यंतचा प्रवास!

पुणे
Last Updated: Mar 09, 2026, 16:34 IST

Dhananjay Dighe UPSC success story Sangamner, Farmer's son becomes IPS 2026, Inspiring UPSC rank 529 Maharashtra, Rural youth clearing civil services exam, Sangamner Ahilyanagar UPSC result news, शेतकऱ्याचा मुलगा आयपीएस झाला, धनंजय दिघे संगमनेर यूपीएससी यश, ५२९ वी रँक यूपीएससी निकाल, ग्रामीण भागातील तरुण अधिकारी, प्रेरणादायी यशोगाथा मराठी.

Advertisement

'घराला आग लागली सगळं उद्ध्वस्त झालं पण...' चिंचपोकळीच्या सोडावाल्याचा प्रेरणादाई प्रवास!

Last Updated: Mar 09, 2026, 16:11 IST

मुंबई : मुंबईतील चिंचपोकळी परिसरात चिंचपोकळीचा सोडेवाला म्हणून ओळखले जाणारे कल्पेश लाड यांनी स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर उभा केलेला जस्ट कूल सोडा पब हा व्यवसाय आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. साध्या पुदीना सोड्यापासून सुरू झालेला हा छोटासा व्यवसाय आज शंभरहून अधिक प्रकारच्या पुदीना सोड्यांसाठी प्रसिद्ध झाला आहे.

Video: नोकरी सोडून मत्स्यपालनाकडे वळला, ५ एकर शेततळं, ६० लाखांचा नफा, स्टोरी वाचायलाच लागतीय

Last Updated: Mar 09, 2026, 15:57 IST

सोलापूर : उच्च शिक्षण घेऊनही अनेक तरुण नोकरीच्या शोधात शहराकडे धाव घेतात. मात्र दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज गावातील 29 वर्षीय उझेब इक्बाल पाटील यांनी वेगळी वाट निवडत मत्स्यपालन व्यवसायात यश मिळवले आहे. बी.ए.पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न धावता त्यांनी मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला आणि अवघ्या दोन वर्षांत तब्बल 60 लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.

Advertisement

Video: पैठणमध्ये नाथषष्ठी उत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी, दक्षिण काशी दुमदुमली

Last Updated: Mar 09, 2026, 15:51 IST

पैठणमध्ये नाथषष्ठी उत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे दक्षिण काशी समजली जाणारी ही भूमी दुमदुमली आहे. हा उत्सव दोन दिवस चालणार आहे. नाथचरणी वारकरी नतमस्तक झाले आहेत.लाखो भाविक या पैठण नगरीमध्ये दाखल झाले आहेत.

Video: राज्यसभेला पवार, आता विधान परिषदेला संजय राऊतांनी पुन्हा नवं नाव लावून धरलं

Last Updated: Mar 09, 2026, 15:15 IST

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं विधान केले आहे. या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ते म्हटले, संकट काळात उद्धव ठाकरेंनी उत्तम प्रकारे राज्याचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या नेत्यानं विधान परिषदेवर असणं हे महाविकास आघाडीसाठी चांगले संकेत आहेत. त्यामुळे आमदारांना बळ मिळतं.

Advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल