सेवानिवृत्तीनंतर एसटी कर्मचारी थेट शेतात, 200 चंदनाच्या झाडांची केली लागवड, कशी केली शेती?
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Mohan Najan
Last Updated:
पर्यावरण संवर्धनाबरोबरच भविष्यात चांगले उत्पन्न मिळावे या उद्देशाने त्यांनी आपल्या शेतात विविध प्रकारच्या झाडांची लागवड केली. विशेष म्हणजे त्यांनी श्वेत चंदन या मौल्यवान वृक्षाची सुमारे 200 झाडे लावून दीर्घकालीन उत्पन्नाचा मार्ग निवडला आहे.
advertisement
1/7

छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री तालुक्यातील डोंगरगाव कवाड येथील रमेश मोरे यांनी एसटी महामंडळातील नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यानंतर शेतीत वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. पर्यावरण संवर्धनाबरोबरच भविष्यात चांगले उत्पन्न मिळावे या उद्देशाने त्यांनी आपल्या शेतात विविध प्रकारच्या झाडांची लागवड केली. विशेष म्हणजे त्यांनी श्वेत चंदन या मौल्यवान वृक्षाची सुमारे 200 झाडे लावून दीर्घकालीन उत्पन्नाचा मार्ग निवडला आहे.
advertisement
2/7
रमेश मोरे यांनी एसटी महामंडळात तब्बल 35 वर्षे सेवा बजावली. 2016 मध्ये ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेतीकडे पूर्णवेळ लक्ष देण्याचे ठरवले. पर्यावरण जपण्याच्या उद्देशाने तसेच शेतीतून वेगळे काही करण्याच्या विचारातून त्यांनी आपल्या शेतात सिताफळ, साग, मोहगुणी आणि चंदन अशा विविध झाडांची लागवड केली.
advertisement
3/7
यामध्ये चंदन आणि सिताफळ झाडे दहा बाय वीस फूट अंतरावर लावण्यात आली आहेत. तर मोहगुणीची लागवड दहा बाय दहा फूट अंतरावर करण्यात आली आहे.
advertisement
4/7
शेतातील झाडांना योग्य प्रमाणात पाणी मिळावे यासाठी त्यांनी ठिबक सिंचनाची व्यवस्था केली आहे. चंदनाच्या झाडांची लागवड करताना त्यांना विशेष काळजी घ्यावी लागते, असे मोरे सांगतात. मात्र एकदा झाडे चांगली वाढू लागल्यानंतर त्यांना फारशी देखभाल करावी लागत नाही. या झाडांवर फारसे रोग येत नाहीत आणि फवारणी किंवा खतांचीही विशेष गरज भासत नाही. सध्या रमेश मोरे स्वतः शेतात राहून या झाडांची देखभाल करत आहेत. चंदन हे मौल्यवान झाड असल्यामुळे त्याचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुढील काळात झाडांच्या संरक्षणासाठी शेताभोवती तारेचे कुंपण उभारण्याचा त्यांचा विचार आहे. विशेष म्हणजे या चंदन लागवडीची नोंद सातबाऱ्यावरही करण्यात आली असून सर्व प्रक्रिया नियमांनुसार करण्यात आली आहे.
advertisement
5/7
शेतातील झाडांना योग्य प्रमाणात पाणी मिळावे यासाठी त्यांनी ठिबक सिंचनाची व्यवस्था केली आहे. चंदनाच्या झाडांची लागवड करताना त्यांना विशेष काळजी घ्यावी लागते, असे मोरे सांगतात. मात्र एकदा झाडे चांगली वाढू लागल्यानंतर त्यांना फारशी देखभाल करावी लागत नाही. या झाडांवर फारसे रोग येत नाहीत आणि फवारणी किंवा खतांचीही विशेष गरज भासत नाही. चंदनाच्या झाडांच्या वाढीसाठी होस्ट झाडे असणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे चंदनाच्या शेजारी मोहगुणी आणि सिताफळाची झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांच्या मुळांमधून मिळणाऱ्या पोषणामुळे चंदनाची वाढ चांगली होते. त्यामुळे योग्य पद्धतीने नियोजन करून लागवड केली तर चंदन शेती फायदेशीर ठरू शकते, असे मोरे सांगतात.
advertisement
6/7
चंदनाची शेती ही संयम ठेवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी योग्य असल्याचेही मोरे स्पष्ट करतात. कारण चंदनाचे झाड पूर्णपणे तयार होण्यासाठी साधारणपणे 10 ते 12 वर्षांचा कालावधी लागतो. अनेक शेतकऱ्यांना कमी कालावधीत उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असते, त्यामुळे ते अशा प्रकारच्या शेतीकडे फारसे वळत नाहीत. मात्र ज्यांच्याकडे दीर्घकालीन नियोजनाची क्षमता आहे, त्यांनी चंदन शेतीचा विचार करावा, असे ते सांगतात.
advertisement
7/7
साधारणपणे एका चंदनाच्या झाडामधून 15 ते 20 किलोपर्यंत चंदनाचा गाभा मिळू शकतो. झाड जितके अधिक वर्षे वाढेल तितका गाभाही वाढत जातो आणि त्यासोबत उत्पन्नाची शक्यताही अधिक वाढते. त्यामुळे भविष्यात या झाडांमधून चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा मोरे व्यक्त करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/कृषी/
सेवानिवृत्तीनंतर एसटी कर्मचारी थेट शेतात, 200 चंदनाच्या झाडांची केली लागवड, कशी केली शेती?