Bigg Boss Marathi 6 : तोड दिया यार मेरे को! रुचिता बिग बॉसमधून आऊट, विशालचा इमोशनल ब्रेकडाऊन; मिठी मारून ढसाढसा रडला
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Ruchita Jamdar - Vishal Kotian : बिग बॉस मराठी 6 मधून रुचिता जामदार आऊट झाली. तिला घरातून निरोप देताना विशाल कोटियन ढसाढसा रडला. विशालचा मेजर ब्रेकडाऊन पाहायला मिळाला.
advertisement
1/8

बिग बॉसच्या घरातील समीकरण प्रत्येक आठवड्याला बदलतात. या आठवड्यातही घरातील सदस्यांबरोबर प्रेक्षकांनाही मोठा धक्का मिळला. रुचिता जामदार बिग बॉसमधून आऊट झाली. तिच्या एलिमिनेशननंतर घरातील स्पर्धक विशाल पूर्णपणे कोसळल्याचं पाहायला मिळालं.
advertisement
2/8
रुचिता बिग बॉसमधून बाहेर पडणत असताना विशालला आपले अश्रू आवरू शकला नाही. रुचिताला निरोप देताना तो तिला घट्ट मिठी मारून रडताना दिसला.
advertisement
3/8
रुचिता घराबाहेर जाण्यापूर्वी विशाल तिला गार्डन एरियामध्ये त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी घेऊन गेला. त्या ठिकाणी विशालने तिला घट्ट मिठी मारली आणि भावूक होत सॉरी म्हणाला.
advertisement
4/8
नंतर तो ओक्साबोक्शी रडत रुचिताला म्हणाला, "मला एक एक करून तोडलं. मला नाही राहायचं इथे. मी काय करणार. 45 दिवस मी नाही राहणार, मला नाही होणार. मी नाही राहणार रुचिता."
advertisement
5/8
रुचिता घराबाहेर जाण्यापूर्वी विशालने तिच्यासोबत असलेलं वाघाचं जॅकेट तिला दिलं. हे असं तुझ्याबरोबर असंही तिला आवर्जून सांगितलं. हा क्षण पाहताना घरातील इतर स्पर्धकही भावूक झाले होते.
advertisement
6/8
रुचिता घराबाहेर जाण्यासाठी दरवाज्याकडे जात असताना विशाल पुन्हा एकदा प्रचंड इमोशनल झाला. दरवाजा बंद होताच तो रडत म्हणाला, "तोड दिया यार मेरेको." यावेळी राकेश बापट विशालला धीर देताना दिसला.
advertisement
7/8
रुचिता जामदारने बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यापासून तिच्या आक्रमक स्वभावामुळे ती सतत चर्चेत राहिली. घरात अनेकदा तिचा आवाज चढलेला पाहायला मिळाला. तिच्या भाषेवरून तिला ट्रोल करण्यात आलं. रुचिताने आरडा ओरडा करूनच जास्त फुटेज मिळवल्याचंही म्हटलं गेलं.
advertisement
8/8
रितेश देशमुखने देखील अनेकदा रुचिताच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली होती. तर दुसरीकडे रुचिता आणि विशाल यांच्यात सुरू असलेल्या नात्याचीही बाहेर खूप चर्चा होती. गेल्या दोन आठवड्यांपासून रुचिता तिच्या आणि विशालच्या नात्याला घेऊन अस्वस्थ असल्याचं पाहायला मिळालं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : तोड दिया यार मेरे को! रुचिता बिग बॉसमधून आऊट, विशालचा इमोशनल ब्रेकडाऊन; मिठी मारून ढसाढसा रडला