TRENDING:

पुण्यातील असं ठिकाण, जिथं मिळतंय फक्त 30 रुपयांत पोटभर जेवण, लांबच लांब असते रांग

Last Updated:
पुण्यातील अनिल आपटे हे गेल्या अनेक वर्षांपासून कुमठेकर रोड याठिकाणी श्री स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्र चालवत आहेत. या मागचा त्यांचा मुख्य हेतू स्वस्तात दर्जेदार जेवण लोकांना देणे हा आहे.
advertisement
1/7
पुण्यातील असं ठिकाण, जिथं मिळतंय फक्त 30 रुपयांत पोटभर जेवण,लांबच लांब असते रांग
पुण्यात अनेक ठिकाणे वेगवेगळ्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी खवय्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र पुण्यातील अनिल आपटे हे गेल्या अनेक वर्षांपासून कुमठेकर रोड याठिकाणी श्री स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्र चालवत आहेत. या मागचा त्यांचा मुख्य हेतू स्वस्तात दर्जेदार जेवण लोकांना देणे हा आहे.
advertisement
2/7
या ठिकाणी फक्त 30 रुपयांत जेवण दिले जाते. त्यामुळे जेवणासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या याठिकाणी दिसतात. दररोज 700 लोक इथे पोटभर जेवण करतात. शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर तरुणांना कमी पैशात जेवण मिळावे, या उद्देशाने आपटे यांनी पोळी भाजी केंद्राची सुरुवात केली आहे.
advertisement
3/7
अनिल आपटे सांगतात की, पुण्यात जी मुले शिक्षणासाठी येतात त्यांच्याकडे मोजकेच पैसे असतात. त्यामुळे बऱ्याच वेळा शिक्षण सांभाळत जर जेवणाचा खर्च कमी झाला तर यासाठी आपण काही तरी करू शकतो. त्यामुळे केटरिंगचा व्यवसाय असल्यामुळे त्याला जोड देत श्री स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्र 2017 मध्ये सुरू केले.
advertisement
4/7
रोज दुपारी 12 ते 2.30 या वेळात तीन ठिकाणी हे केंद्र सुरू असते. सहकार इथे सातव हॉल, कुमठेकर रस्ता आणि सारसबाग इथे हे केंद्र सुरू असते. विशेष म्हणजे ते हे सगळे समाज कार्य म्हणून करत आहेत.
advertisement
5/7
लोकांसाठी काही तरी देणे लागते, या भावनेतून ते पोळी भाजी केंद्र चालवत आहेत. या उपक्रमामुळे 15 लोकांना रोजगार मिळत आहे. फक्त 30 रुपयांत हे जेवण दिले जात असून रोज 700 जण भरपेट जेवतात, असंही आपटे सांगतात.
advertisement
6/7
या ठिकाणी प्रत्येक दिवशी वेगळा मेनू असतो. तुम्हाला त्यामध्ये पोळी भाजी, चटणी आणि भात खायला मिळेल. बुधवार आणि गुरुवारी मेनू ठरलेला आहे. बुधवारी पोळीभाजी करणाऱ्या महिलांना एक दिवस सुट्टी मिळावी हा उद्देश असतो.
advertisement
7/7
या दिवशी पावभाजी आणि पुलाव हा मेनू असतो. तर गुरुवारी स्वामींचा प्रसाद म्हणून पिठलं – भाकरी, खिचडी आणि खर्डा असा मेनू असतो, असंही अनिल आपटे सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
पुण्यातील असं ठिकाण, जिथं मिळतंय फक्त 30 रुपयांत पोटभर जेवण, लांबच लांब असते रांग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल