गेल्या काही दिवसांपूर्वीच सुरज सारंगे जुळ्या बाळांचा वडील झाला होता. घरी जुळ्या बाळांचा आनंद असताना दुसरीकडे आनंदाच्या वातावरणावर नियतीने घाला घातला. या घटनेमुळे सारंगे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, सुरज सांरगे हा अलिबाग वनविभागाच्या तनविरा इथे वनरक्षक म्हणून नोकरीला होता. तर, रहिवासी मुरूड तालुक्यातील सर्वे इथला रहिवासी होता. शुक्रवारी (6 मार्च) रात्री कामावरून टू व्हिलरने घरी परतत असताना त्याचा रेवस- रेड्डी मार्गावर खोदून ठेवलेल्या खड्ड्यामध्ये त्याची अचानक दुचाकी पडली. खड्ड्यामध्ये दुचाकी अचानक पडल्यामुळे त्याला खड्डा किती खोल आहे, हे काहीही कळाले नाही. पण दुर्दैव म्हणजे, सुरजचा खड्ड्यामध्ये पडून जागीच मृत्यू झाला.
advertisement
गेल्या काही दिवसांपूर्वीच सुरज सारंगे जुळ्या बाळांचा वडील झाला होता. जुळ्या बाळांसोबतचा फोटोही त्याने व्हॉट्स ॲपवर स्टेटसला ठेवला होता. शुक्रवारी त्याच्या बाळांनाही घरी आणलं होतं. जुळ्या बाळांच्या स्वागताची तयारी सुरू असताना सुरजच्या निधनाची बातमी त्याच्या कुटुंबीयांना मिळाली, त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. जुळ्या बाळांचा आनंद एकीकडे असताना दुसरीकडे सुरज घरी येत असताना त्याच्यावर काळाने घाला घातला. घरी जुळ्या बाळांचा सर्वांना आनंद असताना दुसरीकडे आनंदावर नियतीने घाला घातला. काही तासांपूर्वीच आनंदीत असलेलं सारंगे कुटुंब काही तासांतच शोकसागरात बुडाले. सुरजच्या या अशा अकाली एक्झिटने सर्वांच्याच मनाल हुर हुर लागून राहिली आहे.
दरम्यान, रेवस- रेड्डी मार्गावरील खोदून ठेवलेल्या खड्ड्यामुळे एका निष्पाप व्यक्तीचा जीव गेल्यामुळे वनविभागाकडून आणि अलिबागकरांकडून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. घडलेल्या प्रकरणी निष्काळजीपणाबाबत संबंधित प्राधिकरण आणि कंत्राटदारांविरोधात महाराष्ट्र वनरक्षक- वनपाल संघटना, शाखा अलिबागचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला असून या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.
