APMC Market: शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दरात वाढ नाहीच, लिंबू आणि केळीला काय मिळाला भाव?
- Reported by:Priti Nikam
- Published by:Mohan Najan
Last Updated:
राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या शेतमालांमध्ये कांदा, द्राक्ष, केळी आणि लिंबूची आवक आणि भाव पाहुयात.
सांगली : राज्यातील मार्केटमध्ये वेगवेगळ्या कृषी मालाची आवक होते. शनिवार, दिनांक 7 मार्च 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या शेतमालांमध्ये कांदा, द्राक्ष, केळी आणि लिंबूची आवक आणि भाव पाहुयात.
कांद्याची उच्चांकी आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख 53 हजार 248 क्विटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 28 हजार 286 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 325 ते 1465 रुपयांपर्यत बाजार भाव मिळाला. तसेच अमरावती मार्केटमध्ये आवक झालेल्या 467 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 1500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
लिंबूची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज 314 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी कोल्हापूर बाजारात आवक झालेल्या 104 क्विंटल लिंबूस 5000 ते 7000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 65 क्विंटल लिंबूस 10000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
द्राक्ष आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 193 क्विंटल द्राक्षाची आवक झाली. यापैकी छत्रपती संभाजीनगर बाजारात 53 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 8000 ते 10000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजार भाव मिळाला.
advertisement
केळीची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 401 क्विंटल केळीची आवक झाली. यापैकी नाशिक बाजारात 290 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 900 ते 2000 रुपये दरम्यान बाजार भाव मिळाला. तसेच पुणे बाजारात आवक झालेल्या 86 क्विंटल केळीस 6000 सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 9:26 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दरात वाढ नाहीच, लिंबू आणि केळीला काय मिळाला भाव?







