advertisement

परभणीच्या 20 गावातून शक्तिपीठ महामार्ग, शेतकरी आक्रमक, बावनकुळेंनी बोलावून घेतले अन्...

Last Updated:

परभणी जिल्ह्यातील २० गावांतून शक्तिपीठ जाण्याचे प्रस्तावित आहेत. यातील बहुतांश गावातील शेतकऱ्यांचा महामार्गाला विरोध आहे.

शक्तिपीठ महामार्ग
शक्तिपीठ महामार्ग
परभणी : परभणी जिल्ह्यातील 20 गावातून शक्तिपीठ महामार्ग जाणार असून बहुशांत शेतकऱ्यांचा जमिनी भूसंपादन व मोजणीस विरोध आहे. या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. महामार्गाच्या भूसंपादनातील मोजणी प्रक्रियेबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
रभणी जिल्ह्यातील महामार्गातील भूधारक शेतकऱ्यांची बैठक महसूलमंत्री बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात झाली. बैठकीसाठी खासदार संजय जाधव, आमदार राजेश विटेकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर उपस्थित होते. महामार्ग भूसंपादन आणि मोजणी प्रक्रियामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत जिल्हाधिकारी, परभणी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी होत माहिती दिली.
advertisement

लागवडीखालील जमीन, आमचा भूसंपादनास विरोध

शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून जात असून यासाठी विविध जिल्ह्यातील मोजणी प्रक्रिया 60 ते 70 टक्के पूर्ण झाली आहे. वर्धा जिल्ह्यात भूसंपादनासाठी 90 टक्के मोजणी झाली आहे.
परभणी जिल्ह्यात गावातील बहुसंख्य जमीन ही शेतीसाठी लागवडीखालील असून शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन व मोजणीस विरोध आहे. याप्रसंगी खासदार जाधव यांनी शेतकऱ्यांच्यावतीने मोजणी प्रक्रियेस होत असलेल्या विरोधाबाबत माहिती दिली. तसेच विविध शेतकरी यांनी आपली बाजू मंत्री बावनकुळे यांच्यासमोर सादर केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
परभणीच्या 20 गावातून शक्तिपीठ महामार्ग, शेतकरी आक्रमक, बावनकुळेंनी बोलावून घेतले अन्...
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement