advertisement

Youtube, Instagram की Facebook कोणामुळे लवकर संपतो फोनमधील डेटा? वेळीच बदला सेटिंग

Last Updated:

"अरे, अजून तर दुपारही झाली नाही, मग एवढा डेटा गेला कुठे?" हा प्रश्न तुमच्याही मनात येत असेल, तर तुम्ही एकटे नाही आहात. घराबाहेर असताना किंवा वायफाय कनेक्टेड नसताना आपला मोबाईल डेटा एखाद्या वाळूसारखा हातातून निसटून जातो. याला कारणीभूत असतात आपल्या मोबाईलमधील लाडकी सोशल मीडिया ॲप्स.

AI Generated photo
AI Generated photo
मुंबई : सकाळ झाली की आपण सर्वात आधी काय करतो? उशीखाली ठेवलेला मोबाईल हातात घेतो आणि 'गुड मॉर्निंग' मेसेजपासून ते इन्स्टाग्राम रिल्सपर्यंत सगळं काही स्क्रॉल करायला सुरुवात करतो. कधी कधी तर इतकी तंद्री लागते की, अर्धा-एक तास कसा जातो हेच कळत नाही. पण अचानक मोबाईलच्या स्क्रीनवर एक मेसेज धडकतो. "You have consumed 50% of your daily data limit" आणि मग आपला मूड खराब होतो.
"अरे, अजून तर दुपारही झाली नाही, मग एवढा डेटा गेला कुठे?" हा प्रश्न तुमच्याही मनात येत असेल, तर तुम्ही एकटे नाही आहात. घराबाहेर असताना किंवा वायफाय कनेक्टेड नसताना आपला मोबाईल डेटा एखाद्या वाळूसारखा हातातून निसटून जातो. याला कारणीभूत असतात आपल्या मोबाईलमधील लाडकी सोशल मीडिया ॲप्स. ही ॲप्स बॅकग्राउंडला सतत रिफ्रेश होत असतात आणि हाय-क्वालिटी कंटेंटमुळे तुमचा डेटा फस्त करतात. चला तर मग जाणून घेऊया, कोणते ॲप्स तुमचा खिसा (आणि डेटा) रिकामा करत आहेत.
advertisement
1. YouTube: डेटा गिळणारं सर्वात मोठं मशिन
जर तुम्ही यूट्यूबवर 'शॉर्ट्स' किंवा लांब व्हिडिओ पाहत असाल, तर सावध राहा. एका अहवालानुसार, तुम्ही जर स्टँडर्ड क्वालिटीमध्ये (480पी) व्हिडिओ पाहत असाल, तरीही हे ॲप एका तासात तब्बल 3GB पर्यंत डेटा वापरू शकतं. हाय-डेफिनेशन (HD) व्हिडिओ तर तुमच्या 1.5 जीबीच्या प्लॅनचा काही मिनिटांतच निकाल लावतात.
advertisement
टीप: डेटा वाचवण्यासाठी व्हिडिओ सेटिंगमध्ये जाऊन 'Data Saver' मोड ऑन करा.
2. Instagram: रिल्सची मजा पण डेटाची सजा
इन्स्टाग्रामवर एकामागून एक रिल्स पाहणं जितकं मजेशीर आहे, तितकंच ते डेटासाठी घातक आहे. हे ॲप कंटेंट आधीच 'प्री-लोड' (Pre-load) करतं, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहताना लोडिंगची वाट पाहावी लागू नये. यामुळे एका तासाच्या वापरामागे 500MB ते 1GB डेटा सहज खर्च होतो. हाय-क्वालिटी फोटोंमुळे ही खपत आणखी वाढते.
advertisement
3. Facebook: स्क्रोलिंगमध्येच 50 एमबी गायब
फेसबुक आता फक्त फोटो पाहण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. यावर मिळणारे व्हिडिओ आणि ऑटो-प्ले होणाऱ्या जाहिराती तुमचा डेटा वेगाने ओढतात. तुम्ही फक्त फीड स्क्रोल केलं तरी 50-100 एमबी डेटा जातो. पण जर तुम्ही फेसबुक वॉच किंवा रिल्स सेक्शनमध्ये गेलात, तर हा आकडा 1 जीबीच्या पुढे जाऊ शकतो.
advertisement
4. Pinterest: दिसायला साधं पण डेटासाठी महागडं
जेव्हा तुम्ही रेसिपी, फॅशन किंवा घराचं डिझाइन पाहण्यासाठी पिंटरेस्ट (Pinterest) उघडता, तेव्हा तुमच्या मोबाईलचा डेटा रॉकेटच्या वेगाने संपतो. यावर असलेल्या हाय-रिझोल्युशन इमेजेसची लांबलचक यादी लोड होण्यासाठी खूप शक्ती लागते. धक्कादायक म्हणजे, हे ॲप केवळ 5 मिनिटांत 85MB डेटा खाऊ शकतं.
डेटा वाचवण्यासाठी काय कराल?
ॲप सेटिंग: प्रत्येक सोशल मीडिया ॲपच्या सेटिंगमध्ये जाऊन 'Data Saver' मोड ऑन करा.
advertisement
फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील व्हिडिओ 'ऑटो-प्ले' होणार नाहीत याची काळजी घ्या.
शक्य असल्यास मोठे व्हिडिओ किंवा रिल्स केवळ वायफायवरच पाहा.
मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन अनावश्यक ॲप्सचा 'Background Data' डिसेबल करा.
तंत्रज्ञान आपल्या सोयीसाठी आहे, पण जर ते आपल्या खिशाला जड जात असेल तर स्मार्ट होणं गरजेचं आहे. वरील ॲप्स वापरताना थोडी काळजी घेतली, तर तुमचा डेली डेटा दिवसभर आरामात टिकू शकेल.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Youtube, Instagram की Facebook कोणामुळे लवकर संपतो फोनमधील डेटा? वेळीच बदला सेटिंग
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement