advertisement

मला हर्ट होतंय..! बायकोला डिवोर्स, अभिनेत्रीसोबत अफेअर, थलापति विजयने पहिल्यांदाच मन मोकळं केलं, VIDEO

Last Updated:

Thalapathy Vijay on Divorce : डिवोर्सच्या चर्चांमध्ये थलापति विजय पहिल्यांदाच चाहत्यांसमोर आला आणि त्याने संपूर्ण प्रकरणावर त्याचं मन मोकळं केलं. विजयचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

News18
News18
साऊथ सुपरस्टार थलापति विजय त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. विजयचा 27 वर्षांचा संसार मोडला. विजयच्या बायकोनं डिवोर्ससाठी कोर्टात धाव घेतली. विजयवर बायको संगीताने विवाहबाह्य संबंधाचे आरोप केलेत. ज्यामुळे विजयच्या सामाजिक, राजकीय आणि मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली.
इतकंच नाही तर विजयच्या डिवोर्सबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा होत असताना तो अभिनेत्री आणि त्याची कथित गर्लफ्रेंड तृषा कृष्णनसोबत लग्नमंडपात दिसला. एका लग्नाच्या रिसेप्शनला दोघांनी एकत्र हजेरी लावली होती. विजयने तृषासोबत लग्नाला हजेरी लावत इनडायरेक्टली दोघांच्या अफेअरवर शिक्का मोर्तब केल्याचंही म्हटलं जात आहे.
advertisement
डिवोर्सच्या चर्चांमध्ये विजय पहिल्यांदाच चाहत्यांसमोर आला आणि त्याने संपूर्ण प्रकरणावर त्याचं मन मोकळं केलं. विजयने लाखो लोकांसमोर त्याची चिंता व्यक्त केली. मला हर्ट होत आहे असंही तो म्हणला.
विजयने चाहत्यांना सांगितलं, "माझ्याभोवती सध्या सुरू असलेल्या अलिकडच्या प्रोब्लेमबद्दल तुम्ही चिंता करू नका. त्या गोष्टी तुमचा वेळ वाया घालवण्याइतक्या महत्त्वाच्या नाहीत. त्या सगळ्या गोष्टी मी स्वतः हाताळेन.  माझ्या प्रोब्लेममुळे तुम्ही दु:खी किंवा तणावात दिसता हीच गोष्ट मला सर्वात जास्त हर्ट होतेय."
advertisement
advertisement
अभिनेता थलापति विजयच्या पत्नीने कोर्टात डिवोर्ससाठी याचिका दाखल केली आहे. 2021 मध्ये तिला विजयच्या अफेअरबद्दल पहिल्यांदा कळलं असं तिनं सांगितलं. त्यानंतर विजयने तिला अफेअर थांबवण्याचं आश्वासन दिलं पण तसं झालं नाही. या काळात विजयची बायको संगीता आणि तिच्या मुलांना प्रचंड मानसिक त्रास झाल्याचंही तिनं सांगितलं.
विजय आणि पत्नी संगीत गेल्या दोन वर्षांपासून वेगळे राहत असल्याचीही माहिती समोर आली आहे. संगीत तिच्या मुलांच्या शिक्षणासाठी विदेशात शिफ्ट झाली असून तिच्या मुलांसोबत तिथे राहते.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
मला हर्ट होतंय..! बायकोला डिवोर्स, अभिनेत्रीसोबत अफेअर, थलापति विजयने पहिल्यांदाच मन मोकळं केलं, VIDEO
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement