T20 World Cup : 'टीममधून बाहेर केल्याने अक्षर पटेल भडकलेला', कॅप्टन सूर्याने सांगितलं कुणी निर्णय घेतला?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
हा सामना जर टीम इंडियाने जिंकला तर यजमान संघ म्हणून वर्ल्ड जिंकणार भारत हा पहिला संघ ठरणार आहे.त्यामुळे भारताच्या विजयाची सगळे आतूरतेने वाट पाहत आहेत.
advertisement
1/9

टी20 वर्ल्ड कपमध्ये उद्या रविवारी 8 मार्च 2026 ला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवृर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात फायनल सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याची संपूर्ण देशभरात उत्सुकता आहे.
advertisement
2/9
हा सामना जर टीम इंडियाने जिंकला तर यजमान संघ म्हणून वर्ल्ड जिंकणार भारत हा पहिला संघ ठरणार आहे.त्यामुळे भारताच्या विजयाची सगळे आतूरतेने वाट पाहत आहेत.
advertisement
3/9
दरम्यान फानयलसाठी प्लेइंग इलेव्हन काय असणार आहे? हा मोठा प्रश्न असणार आहे. सूर्यकुमार यादव कोणत्या खेळाडूला संधी देणार? हे पाहावे लागणार आहे.
advertisement
4/9
पण फायनलआधी टीम इंडियाने अक्षर पटेलला जो टीम इंडियाचा वाईस कॅप्टन आहे,त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केलं होतं.त्यामुळे क्रिकेट विश्वास या निर्णयाची प्रचंड चर्चा रंगली होती. कारण कोणती टीम वाईस कॅप्टनला बाहेर बसवते? असा प्रश्न निर्माण झाला होता.
advertisement
5/9
त्यानंतर याच वाईस कॅप्टनने म्हणजेत अक्षरने इंग्लंड विरूद्ध सेमी फायनल सामन्यात मैदानात उतरून खतरनाक दोन कॅच घेतल्या होत्या. या कॅच खूपच अवघड होत्या आणि मॅचचा निकाल बदलणाऱ्या होत्या.
advertisement
6/9
खरं तर अक्षर पटेलला साऊथ आफ्रिकेविरूद्द सामन्यात बाहेर बसवले गेले होते. त्याच्या जागी रिंकु सिंहला टीममध्ये संधी देण्यात आली होती.
advertisement
7/9
टीम मॅनेजमेंटच्या या निर्णयानंतर अक्षर पटेल खूप रागावला होता,असे सूर्यकुमार यादवने आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
advertisement
8/9
टीमसाठी जे जे कठीण निर्णय घ्यायेच असतात ते मी (सूर्य कुमार यादव) आणि गौतम गंभीर घेत असतो. कारण आम्हाला चांगली टीम हवी असते,असे सूर्यकुमार सांगतो.
advertisement
9/9
साऊथ आफ्रिकेविरूद्ध आमच्या एका निर्णयाने अक्षर पटेल खूप रागावला होता. या निर्णयाने तो अजिबात खूश नव्हता. आणि तसं असायलाही हवं.पण नंतर आम्ही त्याला समजावून सांगितलं तो निर्णय आम्ही का घेतला असे सूर्या म्हणाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
T20 World Cup : 'टीममधून बाहेर केल्याने अक्षर पटेल भडकलेला', कॅप्टन सूर्याने सांगितलं कुणी निर्णय घेतला?